सतराव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्राच्या क्षितिजावर एक नवे घराणे उदयाला येऊ लागले होते. सासवडचे पुरंदरे ! राजाराम महाराजांच्या काळापासून स्वराज्याच्या सेवेत रुजू झालेल्या या घराण्याने अगदी पेशवाईच्या अखेरच्या क्षणापर्यंत स्वराज्याची मनोभावे सेवा केली. कोकणातून वरघाटी आलेल्या बाळाजी विश्वनाथांना प्रथम आसरा मिळाला तो पुरंदर्यांच्याच वाड्यात. प्राप्त होत असलेला पेशवाईचा मान मोठ्या मनाने श्रीवर्धनच्या भटांना दिला पुढे पेशव्यांनीही याचे उपकार म्हणून पुरंदर्यांना सातारा दरबारात मुतालकी आणि सरदारी दिली. अशा या ऐतिहासिक घराण्यातील कर्तबगार पुरुषांची ही कामगिरी. कौस्तुभ कस्तुरे लिखित "पुरंदरे - अठराव्या शतकातील एक कर्तबगार घराणे". ह्या पुस्तकात अठराव्या शतकात पुरंदरे घराण्याला छत्रपती शाहू महाराजांपासून ते सवाई माधवराव पेशव्यांकडून आलेली अस्सल मोडी इनामपत्रे तसेच त्र्यंबक सदाशिव तथा नाना पुरंदर्यांना आलेली काही महत्वाची पत्रे प्रकाशित करण्यात येत आहेत. सदर मूळ मोडी कागदपत्रांची छायाचित्रेही पुस्तकात समाविष्ट करण्यात आली असून ही सर्व कागदपत्रे आजवर अप्रकाशित होती, ती प्रथमच प्रसिद्ध होत आहेत.
पुरंदरे - http://amzn.to/2q2i8uF
Please subscribe to our Channel : http://youtube.com/marathahistory
Visit our website : http://www.marathahistory.com
Twitter : https://twitter.com/padmadurg
Wordpress Blog : http://raigad.wordpress.com
Facebook : http://facebook.com/marathahistory
आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी समकालीन ऐतिहासिक संदर्भ साधनांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके आपण खालील दुव्यावर क्लिक करून online खरेदी करू शकाल -
झंझावात - http://amzn.to/2pRahDP
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ - http://amzn.to/2oU3Xds
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २ - http://amzn.to/2oUfrgI
रणझुंजार - http://amzn.to/2q2fBR0
समरधुरंधर - http://amzn.to/2pR7k6h
All images in the video are for representational purpose only.