अस्सल सावजी मटण थाळीचा हाच तो काळा मसाला | Savji Mutton Thali | Nonveg Hotel | Shivar Food
येवला (जि. नाशिक) येथील बाकळे बंधू हे 1984 पासून नॉनव्हेज हॉटेल चालवितात. येवला शहरातील सचिन बाकळे यांची सावजी मटण खानावळ सर्वात जुनी आहे. विशेष म्हणजे, ते घरीच मसाले बनवितात आणि त्यांची विक्रीही करतात. सावजी मटण खानावळची स्पेशल मटण थाळी खवय्यांच्या पसंतीची आहे. त्र्यंबक सीताराम बाकळे यांनी १९८४ मध्ये ही खानावळ सुरू केली होती. कच्चे मटण बॉईल न करता थेट फोडणी दिली जाते. व्हेजमध्ये काळ्या मसाल्यातील शेवभाजीला प्रचंड मागणी आहे.
#savjimuttonthali
#nonveghotel
#sachinbakleyeola
#shivarfood