MENU

Fun & Interesting

भाग ४५ | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन| निवडक भजन | BHAJAN SANGRAH |

Video Not Working? Fix It Now

२२१. भावना दुखवू नका हो कुणी ! बोलली भारत - माता झणीं ! ! ।।धृ0।। सुपुत्र सगळे माझ्या उदरी । जन्मा आले बहु नर नारी । उद्योगास्तव भिन्न वाटली ।। कुणि नच नीच - ऊंच यातुनी ।।१।। प्रदेश-भाषा ओळखि पुरती । परि राष्ट्राला ती ना पुरती ।। म्हणुनि हिंदला हिंदिचि शोभे - पावली हा अनुभव घेउनी ! ।।२।। भारत - पुत्रे अम्हा म्हणाया । कमीपणा वाटो न कुणाया । तुकड्यादास म्हणे, राष्ट्रीयता - एकता, पाडू नका खंडुनी ! ।।३।। २२२. घेतो धर्माची आण, मनी नाही ईमान । धर्म अशानं कळायचा नाही रे ! धर्म पोरांचा पोयखेळ नाही रे ! ।।धृ0।। तीर्थक्षेत्री गेले, नाही एवढाच धर्म । व्रत-जप केले, नाही एवढाच धर्म ।। दानपुण्य चाले, नाही एवढाच धर्म । माळा-भस्म-टिळे,नाही एवढाच धर्म ।। ही तो धर्माची उपांग भाई रे ! । धर्म पोरांचा पोरखेळ नाही रे ! 0।।१।। तत्त्वाचा विचार, तोच खरा धर्म । सत्याचा आचार, तोच खरा धर्म ।। न्यायाचा व्यवहार, तोच खरा धर्म । करुणा अन्‌ उपकार, तोच खरा धर्म ।। वर्म धर्माच समतेत राही रे ! । धर्म पोरांचा पोरखेळ नाही रे ! 0।।२।। माझा धर्म न्याय अन तुझा धर्म न्यारा । करी भांडाभांडी हा अधर्मचि सारा ।। मानवता ठेवा अन्‌ मग चर्चा करा । तुकड्या म्हणे जगाची धारणा सुधारा ।। बोलण्या चालण्यात ताळमेळ पाही रे ! । धर्म पोरांचा पोरखेळ नाही रे ! 0।।३।। २२३. घाबराला का तरुण गड्यारे ! तुझा पुढारी आला, पुढारी आला, पुढारी आला ।।धृ0।। सावध हो, चल ये मैदानी । निज कर्तव्याला जागोनी । उभाच बंसरिवाला, बंसरिवाला, बंसरिवाला ।।१।। गरुडावरती स्वारि करोनी । उतरत जणु तो दिसे विमानी । चक्र सुदर्शनवाला,सुदर्शनवाला,सुदर्शनवाला ।।२।। दुष्ट जनांना ठार कराया । साधु सज्जन हृदयी धराया । तुकड्या म्हणे धावला, म्हणे धावला, म्हणे धावला ।।३।। २२४. अरे ! रिकामा कशाला फिरतं ? तुझं गावच नाही का तीर्थ ? ।।धृ०।। गावी राहती गरीब उपवासी । अन्नसत्र लावितोसि काशी । हे दान नव्हे का अर्थ ? ।। तुझं0।।१।। तुझ्या गावाची शाळा ही मोडली । धर्मशाळा तू शहरी का जोडली ? याने निघतो का जीवनात अर्थ ? तुझ0।।२।। गावी गरिबांची घरटी ही मोडली । तू तीर्थासि मंदिरे ही जोडली । गाव - गुंड करीती अनर्थ ।। तुझं0।।३।। आपुल्या गावाची सेवा जो करतो । तोचि कीर्तीने, मानाने तरतो । दास तुकड्या म्हणे होई सार्थ ।। तुझं0 ।।४।। २२५. मानवा ! का चिंता वाहतो ? होणारे ते चुके न केव्हा, प्रभु सगळे पाहतो ! ।।धृ0।। नर जन्माला आला जेव्हा ? तू कधि केले होते कामा ? ? परी तुझ्या पोटाची कळकळ, जन्मताचि वाहतो ! ।।१।। अजगर पडला पडुनी राही । चालतसे मुंगीच्या पायी ! ! अचूक त्याची खळगी भरण्या, जागिच कुणि दाहतो ! ।।२।। पोपट - मैना मारि भरारी । कुठले त्यांना स्थान नोकरी ? परी चरुनिया, रोजची येती,मन्मनि उत्साहतो ! ।।३।। म्हणुनि सांगतो स्मर तू हरिला । विसरु नको रे सहकार्याला ? तुकड्यादासा,अनुभव ऐसा,घडि-घडि मज राहतो ! ।।४।।

Comment