देवगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर येथील प्रगतिशील शेतकरी दीपक जोशी हे गेल्या पाच वर्षांपासून विना नांगरणी तंत्राने शेती करत आहेत. शेतात तूर पेरणी करून फक्त एकदा ग्रास कटर आणि तणनाशकाचा वापर केला आहे. कोरडवाहू शेतकरी कापूस, तुरीची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. पण, फळबागेतही विना नांगरणी शेतीचे तंत्र वापरून खर्च कमी होतोय.
शेत जमिनीत तण असणे पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी गरजेचे आहे. शेतीचे अर्थकारण सुरळीत करणारे नांगरणी शेतीचे तंत्र आहे. प्रताप काका चिपळूणकर यांनी विना नांगरणी शेती तंत्र विकसित केले आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी विना नांगरणी शेती वरदान ठरत आहे. दीपक जोशी यांची विना नांगरणीची शेती दिशादर्शक ठरत आहे. पाच वर्षांपासून शेतात नांगरणी नाही, गवत तसेच आहे. फक्त शेतीवरच विश्वास ठेवा, बाकी कुणी कामाचे नाही, असे दीपक जोशी यांचे मत आहे. दीपक जोशी यांनी दिलेली विना नांगरणी शेतीची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत समजून घ्या. शेती नफ्यात कशी आणायची हेच आपण समजून घेऊ.
#pratapkakachiplunkar
#vinanangarnisheti
#deepakjoshidevgaon
#विनानांगरणीशेती
#प्रतापकाकाचिपळूणकर
#shivarnews24