अलौकिक अभिनय सामर्थ्य असलेल्या या प्रतिभावंत कलाकारावरील राष्ट्रसेवादलाचे संस्कार,सामाजिक बांधिलकीचे दर्शन डॉ. श्रीराम रानडे यांनी घेतलेल्या मुलाखतीतून घडते.
कथा अकलेच्या कांद्याची ,सखाराम बाईंडर,बेबी,सूर्यास्त या नाटकात तसेच सामना ,पिंजरा,सिंहासन,शापित,चोरीचा मामला,एक होता विदूषक अशा असंख्य मराठी तसेच हिंदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय आहेत.
४२ ची चळवळ,पंढरपूर मंदीर प्रवेश,गोवा मुक्ती संग्राम,संयुक्त महाराष्ट्र आंदोलन यात त्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग होता.कृतज्ञता निधी सारख्या अनेक सामाजिक उपक्रमातून ते सक्रिय सहभागी होते.