वेदनारहित आयुष्य खरंच सुखाचं होईल का? खरी गोष्ट ही आहे की, दु:खाशिवाय संपूर्ण सुखाची कल्पना व्यर्थ आहे! दु:ख ही सुखाचीच दुसरी बाजू,या मूलभूत सत्याकडेच सुखाच्या प्रवासात निघालेल्या माणसाची दिशाभूल होते आहे. अंतिम सुखसमाधानाचा शोध हा वेदनाविरहित जगाचा नाही, किंबहुना तो वेदनेशिवाय पूर्ण होणे शक्य नाही हेच लोक विसरून चालले आहेत.