MENU

Fun & Interesting

‘ती' मेल्यागत पडून राहिली अन् 'तो' अत्याचार करत होता…मुलीचे जानिवपुर्वक चारित्र्यहनन ?

Rahul Kulkarni Official 66,918 lượt xem 1 day ago
Video Not Working? Fix It Now

‘ती' मेल्यागत पडून राहिली अन् 'तो' अत्याचार करत होता…मुलींचे चारित्र्यहनन कोण केले ?

प्रल्हागटद गाडे कडून युवतीचा गळा आवळून खुन करण्याचा प्रयत्न. पोलिस चौकशीत अनेक नवे खुलासे. स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय युवतीवर बलात्कार करणारा नराधम दत्तात्रय गाडे हा पुणे पोलिसांच्या अटकेत आहे. चौकशीत दोघे संपर्कात असल्याचा बचाव पक्षाच्या वकिलांचा दावाही खोटा असल्याचे दिसून येत आहे वकिलांनी आरोपीचा बचाव खोट्या मुद्द्यावर केल्याचे उघड
मंगळवारी घडलेल्या अत्याचारावेळी आरोपीने आपल्याला जिवंत सोडावे, यासाठी पीडितेने त्याला गयावया

त्या दिवशी नेमके काय घडले आहे ?

*पीडितेला आपण बसमध्ये कंडक्टर असल्याचे खोटे सांगून आरोपी तिला घेऊन गेला. ती बसमध्ये जाताच त्याने बसचा मुख्य दरवाजा आणि चालक व प्रवाशांमध्ये असलेला दुसरा दरवाजाही बंद केला. त्यानंतर पीडितेने बसमध्ये कोणीच नाही, मला खाली जायचे आहे, मला खाली जाऊ दे, अशी विनवणी केली. त्यानंतर आरोपीने पीडितेला बसच्या सीटवर ढकलून दिले. पीडितेने मदतीसाठी आवाजही दिले; मात्र आरोपीने तिचा गळा दाबला, आरोपीने आपल्याला जिवंत सोडावे यासाठी ती बचावाच्या प्रयत्नात होती*

त्याच्याकडे याचना : काय करायचे ते कर, मला जिवंत ठेव...

पीडिता घाबरली आहे, ती प्रतिकार करत नसल्याचे लक्षात येताच नराधमाने दुसऱ्यांदा तिच्यावर अत्याचार केल्याची बाब याप्रकरणात समोर आली. तिने काय करायचे ते कर पण मला जिवंत ठेव, अशी याचना नराधमाकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आरोपी दत्तात्रय बसमधून उतरल्यानंतर पीडितेने बसने गावाला जात असताना तिच्या मित्राला आणि बहिणीला फोनद्वारे तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. त्यांनी पीडितेला धीर देत स्वारगेट पोलिस ठाण्यात जात आरोपीविरोधात तक्रार देण्याचे सांगितल्यानंतर तिने पोलिस ठाण्यात तक्रार दिली.


यापूर्वीही एकदा आरोपीने बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील पीडितेने घाबरून केवळ चोरीची तक्रार दिली होती..

आरोपी शिरूर मधल्या लॅाज बाहेर बसून लॅाज मधून बाहेर पडणाऱ्या महिलांचे छुपे चित्रीकरण करत असल्याचे मान्य केले


आरोपीच्या खात्यात महिनाभरापासून २४९ रुपये

स्वारगेट बसस्थानकातील अत्याचार प्रकरणात आरोपीचे वकील न्यायालयात संगनमताने हा प्रकार झाल्याचे सांगतात. त्यावेळी आरोपी दत्तात्रय याने काही पैसे दिल्याचेदेखील सांगितले गेले.

तपासात मात्र आरोपीच्या बैंक खात्यात घटनेपूर्वी महिनाभरापासून केवळ २४९ रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी तपासले दोघांच्या मोबाइलचे २ वर्षांचे सीडीआर

पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर आरोपी दत्तात्रय आणि पीडितेच्या मोबाइलचे दोन वर्षांचे सीडीआर डिटेल्स तपासण्यात आले आहेत. त्यात कुठेही संबंधित आरोपी आणि पीडिता हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचे दिसून आले नाही

Comment