MENU

Fun & Interesting

रेशीम उद्योगासाठी चॉकी सेंटर | रेशीम उद्योग | रेशीम शेती | Sericulture | Silkworm Business

Kavyaaa's Vlog 28,188 lượt xem 2 years ago
Video Not Working? Fix It Now

परिसरातील रेशीम शेतकऱ्यांची गरज ओळखून वाकी बुद्रूक (जि. पुणे) येथील विजय गारगोटे यांनी प्रशिक्षण घेऊन रेशीम कीटक चॉकी सेंटर सुरू केले. त्या माध्यमातून रेशीम शेतकऱ्यांना दहा दिवसांच्या निरोगी व सुदृढ रेशीम अळ्यांचा पुरवठा होऊ लागला. परिणामी गारगोटे यांना उत्पन्नाचा सक्षम स्रोत उत्पन्न झालाच शिवाय उत्तम प्रतीच्या रेशीम कोषांचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळू लागले. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर (खेड) तालुक्यात महामार्गापासून पूर्वेकडे सहा किलोमीटर अंतरावर वाकी बुद्रूक गाव आहे. लोकसंख्या साधारणपणे तीन- चार हजारांपर्यंत आहे. अर्थव्यवस्था संपूर्णपणे शेतीवरच अवलंबून असलेल्या या गावात कांदा, बटाटा, ऊस व अन्य भाजीपाला पिके घेतली जातात. वाढलेला उत्पादन खर्च, त्या प्रमाणात मिळत नसलेला दर यामुळे परिसरातील शेतकरी रेशीम शेती सारख्या पूरक व्यवसायाकडे वळला. गावातील विजय सुनील गारगोटे यांची वडिलोपार्जित तीन एकर शेती आहे. साहजिकच उत्पन्नाला आणखी आधार शोधण्यासाठी पदवीधर असलेले विजय देखील रेशीम उद्योगाकडे वळले. जवळपास नऊ वर्षांपासून हा व्यवसाय ते यशस्वीपणे चालवीत आहेत. एक एकरापासून सुरवात सुरवातीला प्रयोग म्हणून विजय यांनी एक एकरावर तुती लागवड केली. त्यासाठी पाच फुटी सरी व साधारणपणे सात इंचाच्या काड्यांचा वापर केला. पाच ते सहा महिन्यानंतर तुतीचा पाला रेशीम अळ्यांना खाण्यायोग्य झाला. मग पहिली बॅच घेण्यात आली. सध्या अडीच एकरांवर तुतीचे क्षेत्र वाढविले आहे. याशिवाय चॉकी सेंटर सुरू केल्याने त्यात आणखी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आठ एकर शेती कराराने घेतली आहे. तिथेही तुती लागवड करून व्यवसाय वाढविण्याचा संकल्प केला आहे. एकदा तुती लागवड केल्यानंतर दहा ते पंधरा वर्षे फारशी अडचण येत नाही. त्यामुळे दरवर्षी पीकबदल करण्याची गरज नसल्याने खर्चात मोठी बचत झाली आहे. लागवड केल्यानंतर तुतीला वर्षातून एक किंवा दोन वेळा शेणखत दिले जाते. सुरवातीला आठ दिवसांनी पाणी दिले जायचे. कालांतराने त्यात वाढ करून दहा ते पंधरा दिवसांनी पाणी दिले जाते. त्यामुळे पाण्याची मोठी बचत झाली आहे. तुतीवर रोग- किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होत असल्याने फवारणीचा खर्चही अन्य पिकांच्या तुलनेत कमी होतो. तीन महिन्यांचे प्रशिक्षण रेशीम कीटक संगोपनात सर्वात महत्त्वाची व काळजीपूर्वक लक्ष द्यावी अशी अवस्था म्हणजेच चॉकी संगोपन. नऊ वर्षे रेशीम व्यवसाय यशस्वीरीत्या पेलल्यानंतर विजय यांनी चॉकी अवस्थेतील प्रशिक्षणाची गरज ओळखली. जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत म्हैसूर (कर्नाटक) येथील रेशीम संशोधन केंद्रात तीन महिन्यांचे शास्त्रीय पध्दतीचे चॉकी संगोपन प्रशिक्षण घेतले. चॉकी सेंटरची सुरवात प्रशिक्षणातून आत्मविश्‍वास वाढला. मग ऑक्टोंबर २०१८ मध्ये शेतकऱ्यांच्या मागणीनुसार प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध जागेमध्ये तसेच अल्पशा उत्पन्नामध्ये चॉकी सेंटरची सुरवात केली. गुणवत्ताप्राप्त चॉकी उत्पादन व सेवा यातून शेतकऱ्यांना फायदा दिसू लागला. एक-दीड वर्षातच पुणे जिल्ह्यातून चॉकीसाठी मागणी वाढू लागली. हा पुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रशस्त जागेची गरज ओळखली. मग तुती बागेच्या जवळच दहा हजार अंडीपुंज क्षमतेचे आणि सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेले चॉकी सेंटर २०२० अखेरपर्यंत उभारून पूर्ण केले. व्यवस्थापनातील बाबी

चॉकी कक्षात बदलत्या ऋतुप्रमाणे तापमान २३ ते २७ अंश सेल्सिअस तसेच आर्द्रता ७५ ते ८० टक्के दरम्यान ठेवण्यासाठी आवश्यक साधनांचा वापर केला जातो.

विविध औषधांचा वापर करून आणि आवश्यक काळजी घेऊन अळ्यांचे आरोग्य राखले जाते. -बंगळूर येथून अंडीपुंज आणले जातात. अंडीपुंज निर्मिती कक्षातून अंडीपुंज काढताना तापमान हा घटक महत्त्वाचा असतो. बाहेर काढल्याच्या दिवसापासून १३ व्या दिवशी अळ्या अंड्यामधून बाहेर येतात. ‘इनक्युबेशन’ प्रक्रिया सर्वात महत्त्वाची प्रक्रिया असते. यामुळे अंड्यातील भ्रूण निरोगी व सुदृढ जन्माला येतात. अळ्या अंड्यामधून बाहेर येतात त्यानंतर पहिले खाद्य व दिवसातून दोन ते तीनवेळा खाद्याचे नियोजन केले जाते. साधारण आठ ते दहा दिवसांत चॉकी प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर त्यांचा शेतकऱ्यांना पुरवठा केला जातो.

यंत्राद्वारे तुतीच्या पाल्याची समप्रमाणात कापणी केली जाते. त्यामुळे पाला खाणे अळ्यांना सोईस्कर होते. तसेच सर्व अळ्या एकसमान पद्धतीने अवस्था पूर्ण करतात. याचा फायदा एकत्रित कोष तयार होऊन जास्तीचे उत्पादन मिळण्यास होतो.


#रेशीम_शेती_चॉकी_सेंटर
#रेशीम_शेती
#रेशीम_उद्योग
#रेशीम
#रेशीम_शेती_यशोगाथा
#रेशीम_शेती_अनुदान
#रेशीम_शेतीचा_खर्च
#रेशीम_शेती_उद्योग
#रेशीम_कोष_निर्मिती
#रेशीम_उद्योग_माहिती
#रेशीम_कोष
#रेशीम_आळी
#रेशीम_आळी_संगोपन
#चॉकी
#रेशीम_कीटक_संगोपन
#रेशीम_कोष_दर
#रेशीम_कीटक_आणि_शेती
#रेशीम_व्यवसाय
#रेशीम_आळी_माहिती
#रेशीम_धागा_माहिती
#रेशीम_शेती_कशी_करावी
#रेशीम उद्योग व्यवसाय
#रेशीम_शेती_लाखमोलाची
#रेशीम_किडे_का_जीवन_चक्र
#रेशीम_शेती_विषयक_माहिती
#रेशीम_शेती_ठरली_फायदेशीर

Comment