. हैदराबाद संस्थानातील रजाकार संघटनेचा प्रमुख कासीम रझवी .हा मूळचा उत्तर प्रदेशातील लखनऊचा रहिवासी असून लातूरमध्ये काही कालखंड त्याचे वास्तव्य होते, 1946 ते 48 दरम्यान रझाकार संघटनेच्या माध्यमातून या माणसाने हैदराबाद संस्थान मध्ये अक्षरशः हैदोस घातला होता आजही रझाकार म्हटले की लोकांच्या अंगाचा थरकाप उडतो. हैदराबाद संस्थांच्या स्वातंत्र्यानंतर कासिम रजविला सात वर्षाची शिक्षा झाली ती शिक्षा त्यांनी येरवड्याच्या तुरुंगामध्ये भोगली. त्यानंतर 18 सप्टेंबर 1957 ला तो पाकिस्तानला गेला. त्या ठिकाणी 1970 साली त्.याचे निधन झाले कासिम रजवी ची मुलगी फौजीया एजाज खान पाकिस्तान मध्ये खासदार आहेत.