वेळ काढून पहाच ! ह.भ. प. रामराव महाराज ढोक ! रामायण कथा! भाग १ Ramrav Maharaj Dhok Ramayan Part 01
चंपाषष्ठी उत्सवानिमित्त जेजुरी मंदिर जीर्णोद्धार व मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा श्री रामायण कथा श्री रामायानचार्य रामराव महाराज ढोक यांच्या रसाळ वाणीतून दि.२२ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०२२ सायंकाळी ६ ते ९ वाजता आयोजक - श्री.खंडोबा मंदिर देवस्थान ट्रस्ट,सर्व नोकरदार,तरुण मित्र मंडळ, महिला मंडळ तसेच समस्त ग्रामस्त मंडळी, सावरगाव घुले व पंचक्रोशी ठिकाण - श्री. क्षेत्र खंडोबा देवस्थान सावरगाव घुले ता.संगमनेर जि.अहमदनगर कथाकार - ह.भ.प. रामायानचार्य रामराव महाराज ढोक,गायक- ह.भ.प.रोहिदास महाराज जगदाळे, हार्मोनियम -ह.भ.प.काशिनाथ महाराज पाटील, तबला-ह.भ.प.अश्विन कुमार, मंडप व्यवस्था - जोंधळे डेकोरेटर्स महेश जोंधळे-९८९०६५५२६१, साउंड व्यवस्था - व्हायब्रेशन साउंड अशोक काशिद ९६५७१७१७०६.
राम कृष्ण हरी...!!!
या चॅनेल वरील व्हिडिओ मार्फत समाज प्रबोधन करणे आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करणे हाच एकमेव उद्देश आहे.
आमच्या चॅनलवरील विडिओमुळे कुणाच्याही वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नाही.
कीर्तन प्रवचन ही महाराष्ट्रातील आणि देशातील एक अतिशय समृद्ध परंपरा आहे. भारतीय सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक जीवन समृद्ध होण्यासाठी कीर्तन परंपरेने फार मोठा हातभार लावलेला आहे. गेली शेकडो वर्षे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक, भावनिक आणि मानसिक पोषण करण्याचे काम हजारो कीर्तनकारांनी केलेले आहे आणि आजही करीत आहेत.
कीर्तन हे देव, देश आणि धर्म यांचा प्रचार प्रसार करण्याचे, युवापिढीवर संस्कार करण्याचे अतिशय उत्तम माध्यम आहे.
कीर्तन ही मनोरंजनाबरोबरच संगीत, नृत्य, साहित्य, कला, इतिहास, संस्कृती परंपरा यांचीही ओळख आपल्याला करून देतात. मानवी जीवनाला वळण लावण्याचे एक विलक्षण सामर्थ्य कीर्तनकलेमध्ये आहे. विशेषत: तरूण पिढीमध्ये कीर्तनाविषयी आवड आणि जाण रूजविता येईल यासाठी विविध प्रकारच्या कीर्तनांचे व्हिडिओ प्रदर्शित करण्यात येतील.
#kirtansohala
#ramayan