सीताफळ लागवड तंत्रज्ञान अत्यंत सोप्या आणि साध्या भाषेत....!
सीताफळ लागवड माहिती
सीताफळाचे विक्रमी उत्पादन कसे घ्यावे
भारतात सीताफळाची लागवड आंध्र प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडू उत्तर प्रदेश बिहार या राज्यांत प्रामुख्याने केली जाते.
मेक्सिकोत सीताफळ अझेटेक या नावाने ओळखले जाते.
दगडी भागात येणारे म्हणजे हलक्या मुरमाड जिरायती व निकृष्ट जमिनी देणारे हे फळपीक आहे.
उष्ण व कोरडे हवामान व मध्यम थंडी तसेच कमी थंडी या पिकास मानवते पडत थंडी व धुके या फळपिकांस सहन होत नाही.
या फळाचे उगम स्थान उष्णकटिबंधीय अमेरिकेत आहे भारतात याचा प्रसार पोर्तुगीजांनी केला.
कोरडवाहू फळ झाडांपैकी सीताफळ हे महत्त्वाचे लोकप्रिय फळ आहे
या फळ झाडाच्या पानांमध्ये करीन आणि कीटकनाशक गुणधर्म असलेली अल्कलोईड द्रव्य असतात.
त्यामुळे कोणताही प्राणी या झाडाचे पाणी खात नाही त्यामुळे या बागेला कुंपणाची आवश्यकता नसते
या फळात 16 ते 20 टक्के साखर असते.
सिताफळाच्या 100 ग्रॅम ठाणा योग्य दरात साठ ते ऐंशी मिलिग्रॅम क जीवनसत्व असते.
हे फळ मधुर व थंड असल्याने इतर नाशक शक्तिवर्धक तसेच रोग प्रतिकार शक्ती वाढवणारे शुक्रवर्धक आहे.
पानाचा लेप डोकेदुखी तर पानाचा अर्क कीटकनाशक म्हणून वापरले जाते.
सीताफळांच्या बियापासून 30 टक्के तेल मिळते त्याचा उपयोग साबण बनवण्यासाठी होतो.
तर पिंडीचा उपयोग खत म्हणून होतो.
झाडांच्या फळात पानात व मळ्यात औषधी गुणधर्म असतात.
सीताफळ गर जाम सरबत तसेच श्रीखंड बासुंदी आईस्क्रीम इत्यादी मध्ये वापरले जाते.
हवामान
उष्ण व कोरडे
सिताफळाच्या सुयोग्य वाढीसाठी 30 ते 42 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते
400 ते 700 मिलिमीटर पर्जन्यमान असलेल्या भागात सिताफळ चांगल्या प्रकारे येते.
जमीन
मुरमाड हलक्या जिरायती जमिनीमध्ये सिताफळ चांगल्या प्रकारे येते.
मात्र हलक्या जमिनीत एक फुटाच्या आत जर खडकाची तळी लागली तर मात्र अशा जमिनीत सीताफळाची लागवड करू नये.
पाणी व्यवस्थापन
पूर्ण वाढ झालेल्या प्रति झाडास प्रति दिवस 50 ते 60 लिटर पाणी लागते.
सीताफळाची महत्त्वाच्या अवस्था म्हणजेच संवेदनशील अवस्था जसे सूक्ष्म फळांची निर्मिती फुलधारणा फळधारणा फळांची वाढीची अवस्था या अवस्थांमध्ये पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे.
सर्वसाधारणपणे
हलक्या जमिनीत 5 ते 6 दिवसांनी
मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी
भारी जमिनीत 10 ते 12 दिवसांनी
सीताफळाला पाणी द्यावे.
ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन
महिना पाण्याची गरज लिटर/ झाड/दिवस
जून 12 जुलै 12 ऑगस्ट 20 सप्टेंबर 27 ऑक्टोबर 32 नोव्हेंबर 40 डिसेंबर 28 जानेवारी 30फेब्रुवारी 35मार्च 42 एप्रिल 45मे 50
खत व्यवस्थापन
45 बाय 45 बाय 45 सेंटिमीटर आकाराचे खड्डे घेऊन एप्रिल-मे महिन्यात तापवून घ्यावेत.
त्यानंतर त्यामध्ये
वरच्या थरातील माती+
एक घमेले शेणखत+
एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट+
25 ग्रॅम फोरेट 10 जी मिसळून पावसाळ्यापूर्वी खड्डे भरून घ्यावे त.
पूर्ण वाढ झालेल्या प्रति झाडाला बांगडी पद्धतीने तीन घमेले शेणखत
+अधिक 250:125:125 ग्रॅम
नत्र स्फुरद पालाश या प्रमाणात रासायनिक खते द्यावीत.
म्हणजेच 500 ग्रॅम युरिया
800 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि
200 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश
ही रासायनिक खते आपणाला द्यावी लागते.
यामध्ये संपूर्ण स्फुरद व पालाश आणि अर्धे नत्र बहाराच्या वेळी द्यावे.
तर उरलेले अर्धे नत्र फळधारणा होताच द्यावे.
माती परीक्षण आम्हाला प्रमाणे मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा बहाराचे पाणी सोडताना द्यावे.
अच्छादन
उसाचे पाचट पालापाचोळा गव्हाचा भुसा तसेच त्यांचे अवशेष आपण बागेमध्ये आच्छादन म्हणून वापरू शकतो.
बाष्पीभवनाचा वेग कमी करून जिवाणूसंवर्धन अस मदत होते.
तणांचा उपद्रव कमी होतो. झाडांची उत्पादकता वाढते व चांगल्या प्रतीचे फळांची निर्मिती होते.
लागवड अंतर
सिताफळाची लागवड मुरमाड जमिनीमध्ये चार बाय चार मीटर अंतरावर करावी.
तर मध्यम काळा जमिनीमध्ये पाच बाय पाच मीटर अंतरावर सिताफळाची लागवड करावी.
वरील अंतरे हे शिफारस केल्याप्रमाणे आहेत.
परंतु
शेतकरी सध्या अतिघन लागवड करीत आहेत.
चार बाय अडीच मीटर अंतरावर सिताफळाची अतिरेक्यांना लागवड शेतकरी सध्या करीत आहेत.
जाती
1. फुले पुरंदर
2014 साली महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी ही ही जात संशोधित केलेली आहे.
त्याच्या ठळक वैशिष्ट्ये मध्ये
फळाचे सरासरी वजन 450 ते 550 ग्रॅम आहे.
प्रति झाड उत्पादन 60 ते 80 किलो असून अन्य प्रचलित जाती पेक्षा अधिक आहे.
दोन्ही बहरासाठी सुयोग्य अशी जात आहे. उन्हाळी आणि पावसाळी
फळांची साठवण क्षमता अन्य प्रचलित जाती पेक्षा चांगली असून फळांचा आकर्षक गडद हिरवा रंग तसेच घराचा रंग शुभ्र पांढरा आहे
गगरामध्ये अधिक पाकळ्या व प्रक्रियेची क्षमता सर्वात अधिक
फळे प्रक्रिया गर साठी अधिक उपयुक्त
अल्हाददायक सुगंध सौम्य स्वाद व जिभेवर दीर्घकाळ टिकणारी चव
किडी रोगास मध्यम प्रतिकारक
2. बालानगर
अत्यंत चांगली खात्रीशीर उत्पादन क्षमता असलेली जात
3. एन एम के 1गोल्डन स्थानिक वाण
पूर्ण वाढ झालेल्या प्रति झाडाला
बहार व्यवस्थापन
उन्हाळी व पावसाळी असे दोन बहार सिताफळा मध्ये घेतले जातात.
उन्हाळी बहार घेताना जानेवारी ते मे महिन्यामध्ये ताण सोडण्यात येतो. या बहराचे उत्पादन जून ते ऑक्टोबर महिन्यात मिळते.
पावसाळी बहार जून ते जुलै या कालावधीत पावसाच्या आगमनाने सोबत सुरू होतो.
या बहाराची फळे ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंत उपलब्ध होतात.
बहाराच्या नियोजनामध्ये सूर्यप्रकाश अर्धा हे घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत.
बहराचे पाणी सुरू झाल्यापासून ते फळ काढणीपर्यंत जास्तीत जास्त सूर्यप्रकाश कसा मिळेल हे पाहावे.
यामुळे रोगांचा प्रादुर्भाव उपद्रव होतो त्यामुळे फळे जमिनीलगतच्या भागात आढळून येतात.
त्यासाठी
बहराचे पाणी सोडण्यापूर्वी झाडांची खोडे दोन फुटापर्यंत पूर्ण रिकामी करावीत व त्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावावी. तसेच बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी
झाडांना वळण व आकार देणे महत्त्वाचे असून आच्छादनाचा वापर करावा.