ईडा, पीडा, विवाह दोष, कर्जमुक्ती करणारे 'श्री मंगळदेव ग्रह मंदिर' | MANGAL GRAHA MANDIR, AMALNER.
ईडा, पीडा, विवाह दोष, कर्जमुक्ती करणारे 'श्री मंगळदेव ग्रह मंदिर'
जळगाव लाईव्ह न्यूज । गौरी बारी । कुंडलीत मंगळ असला कि अनंत अडचणी येतात. त्यातल्या त्यात मंगळ दोषामुळे विवाह कार्यास बाधा येते असे म्हटले जाते. मंगळाची शांती केल्यास सर्व अडचणी दूर होतात आणि पुढील मार्ग सुकर होतात असे भाविकांचे म्हणणे तथा श्रध्दाभाव आहे. अमळनेर येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरातच मंगळ देवतेची स्वयंभू पाषाण मूर्ती आहे. शिवाय विश्वातील एकमेव भूमीमातेचीही मूर्ती आहे. आज आपण या मंदिराचा इतिहास आणि माहिती जाणून घेणार आहोत.