खुसखुशीत, रंगीबेरंगी, भरपूर लेयर्स असलेले चिरोटे बनविण्याची कृती
सकाळच्या किंवा दुपारच्या वेळी खायला,गौरी - गणपती पुढे ठेवायला, दिवाळीच्या फराळात पाहुण्यांना द्यायला असे रंगीबेरंगी,आकर्षक चिरोटे फार छान लागतात आणि खुसखुशीत असल्याने सर्वांना आवडतात सुध्दा.
साहित्य
मैदा
कॉर्न फ्लोअर
तेल
पिठीसाखर
तूप
खाण्याचे रंग
मीठ
प्रथम मैद्यात किंचित मीठ आणि गरम तेल (मोहन) घालून एकत्र करून घेणे. नंतर त्याचे तीन किंवा अधिक भाग करून प्रत्येक भागात आवडीप्रमाणे चिमूटभर वेगवेगळे रंग टाकणे व प्रत्येक रंगाचे गोळे भिजवून साधारण वीस मिनीटे झाकून ठेवणे.
तूप आणि कॉर्न फ्लोअर एकत्र घट्ट फेटून त्याचा साठा तयार करून घेणे.
वेगवेगळ्या रंगाच्या पातळ पोळ्या लाटून घेणे.प्रत्येक पोळी एकावर एक ठेवून घेणे. (लेयर्स तयार करून घेणे)प्रत्येक पोळी ठेवल्यावर त्यावर सर्व बाजूने साठा लावणे. नंतर सर्व सर्व पोळ्यांची एकत्र गुंडाळी करून सुरीने समान भाग करणे व मंद आचेवर तेलात तळून घेणे.
तयार झालेल्या चिरोट्यांवर आवडीप्रमाणे पिठीसाखर किंवा मीठ भुरभुरणे.
#food
#खुसखुशीत चिरोटे
#रंगीबेरंगी चिरोटे
#भरपूर लेयर्स असलेले चिरोटे
#multilayer chirote