ऊसामध्ये १०० टनापेक्षा जास्त उत्पादन | कृषिभूषण संजीव माने | Sugarcane Farming | Sugarcane Growing
मेहनत, प्रयोगशीलता जपत आष्टा (ता. वाळवा, जि, सांगली) येथील प्रगतीशिल शेतकरी कृषिभूषण श्री संजीव गणपतराव माने यांनी ऊस शेती यशस्वी केली. गेल्या २० वर्षांहून अधिक कालावधीपासून त्यांनी एकरी १०० टनांचे लक्ष्य ठेऊन केलेल्या प्रयत्नांना चांगले यश मिळाले आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रयोगशील ऊस उपादकांच्या मदतीने त्यांनी ‘लक्ष्य एकरी १५१ टनाचे’ या प्रयोगाला गती दिली असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे सध्या काही शेतकरी एकरी १३९ ते १५० टनापर्यंत पोहोचले आहेत. कृषिभूषण संजीव गणपतराव माने यांचे भविष्यातील लक्ष्य हे एकरी २०० टन ऊस लागवडीचे असून चला आज त्यांच्याकडून जाणून घेऊया जमिनीची सुपिकता, माती परिक्षण, दर्जेदार बेणे निवड, बेणे प्रक्रिया, शिफरशीत खत मात्रा, हवामानानुसार ऊस पीक व्यवस्थापन, पीक उत्पादन वाढ इत्यादी विषयीचे शास्त्रीय मार्गदर्शन.