हरीजनाची कोणां न घडावी निंदा ।
साहात गोविंदा नाहीं त्याचें ॥१॥
रूपा येऊनियां धरी अवतार ।
भक्तं अभयकर खळां कष्ट ॥ध्रु.॥
दुर्वास हा छळूं आला अंबॠषी ।
सुदर्शन त्यासी जाळित फिरे ॥३॥
द्रौपदीच्या क्षोभें कौरवांची शांति ।
होऊनि श्रीपति साह्य केली ॥४॥
न साहेचि बब्रु पांडवां पारिखा ।
दुराविला सखा बळिभद्र ॥५॥
तुका म्हणे अंगीं राखिली दुर्गंधि ।
अश्वत्थामा वधी पांडवपुत्रां ॥६॥