#Farmpond#BekinkereVillge#MallappaBhatkande
|Tarun Bharat Social Media | तरुण भारत |
कमी होत असलेले पावसाचे प्रमाण, भू-गर्भातील कमी झालेला पाण्याचा साठा पावसाचा अनिश्चितपणा, यातच यावर्षी मान्सुनने ओढ दिल्याने भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. वारंवार अशाप्रकारे दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यावर मात करण्यासाठी बेकिनकेरे येथील प्रगतशील शेतकरी मल्लाप्पा भातकांडे यांनी स्वखर्चातून जवळ-जवळ दीड लाख रूपये खर्च करून शेत तळय़ाची निर्मिती केली आहे. शासनाच्या कोणत्याही अनुदानाची वाट न पाहता स्वखर्चातून शेत तलाव बांधला आहे. त्य़ाच्या या उपक्रमाचा आदर्श इतर शेतकऱयांनी घेतल्यास निश्चित पाणी टंचाईवर मात करता येईल आणि विविध पिकांचे उत्पादन घेता येईल. पावसाळय़ात पाणी साचल्यानंतर यामध्ये मत्स्य सोडून मत्स्य पालन करण्याची इच्छा शेतकऱयाने व्यक्त केली आहे,
Website : http://www.tarunbharat.com
Facebook : https://www.facebook.com/tarunbharatdaily
Twitter : https://twitter.com/tbdnews
Ads : DCB Bank
Lokamanya Society