केळशी मच्छि बाजारातुन मासे आणले 😍 | दुपारी जेवणात बनवली तव्यातली कोळंबी - Ambavali, Mandangad (Konkan) आम्ही केळशी येथे मासे खरेदी करायला गेलो होतो. गावी आम्हाला केळशी हे मुख्य बाजारपेठ आहे. केळशी येथे स्वस्त मासे खरेदी करता येतात. आम्ही आमच्या आंबवली गावावरून सकाळी लवकर केळशी येथे गेलो. खाडीची ताजी मच्छि केळशी बाजारात विक्रीसाठी आली होती. ताजी मच्छि आम्ही खरेदी केली. कोळंबी, फ्राय करायला आणखी रेनवी, खाडीची मच्छि खरेदी केली. मासे खरेदी करून केळशी बीचवर गेलो. घरी येऊन आम्ही एकत्र अनिल काकांच्या घरी दुपारचे जेवण बनवले. दुपारच्या जेवणात तव्यातली कोळंबी फ्राय, कोलंबी सुक्का, मच्छिचे कालवण, मच्छि फ्राय केले होते. प्रांजु आणि वर्षा दोघी जेवायला आल्या होत्या. वर्षाने तांदळाच्या भाकऱ्या भाजल्या. भाकरी भातासोबत मच्छिचा बेत भारी होता. आम्ही जेवण तयार करून एकत्र जेवण केले. कोळंबी फ्राय, कोळंबी सुक्की खूपच छान झाली होती. खाडीची मच्छि खूप चवदार असते. आम्ही फ्राय केलेली मच्छि आम्हा सर्वांना खूप आवडली. तुम्हाला या व्हिडिओमध्ये केळशी मच्छि बाजारातील मच्छि आणि आम्ही दुपारी एकत्र केलेले जेवण दखवले आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #KolambiFry #TavyataliKolambi #KolambiSukka #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.instagram.com/koknatlamumbaikar