MENU

Fun & Interesting

शाहिर बबन ईश्वर थोरात ,तासगांव जि.सांगली....बिरूदेवाचा जन्म कसा झाला संग्रहीत ओवी

Video Not Working? Fix It Now

Suresh Kachare kola (धनगरी ओवीचा बेताज बादशाह स्व. बबन(आण्णा) ईश्वर थोरात , जन्म.- 01/06/1953 मृत्यू.- 13/12/2007 ) बिरूदेव ओवीकार मंडळ तासगाव चे शाहिर बबन ईश्वर थोरात हे मूळचे तासगाव तालुक्याचे होते त्याच्या आई वडिलांची परिस्थिती हलाक्याचीच होती , पण त्यांचे स्वप्न सामाजिक भावनेशी निगडीत होते . त्यांना बालपणा पासून सामाजिक आवड होती , शिक्षण पूर्ण करून त्यांनी एसटी महामंडळात नोकरीस सुरूवात केली ते कंडक्टर पदी विराजमान झाले ,तासगाव डेपोला असतांना अमावस्याला त्यांची एसटी बस तासगाव ते आरेवाडी अशी टिरप असायची पण ते स्वतःच एसटीला रेडिओ स्पिकर लावून येत होते , आरेवाडीत आले की लोकं दर्शनास जात होते , तो पर्यंत तिथे ओवी चालू झाली असायची , लोक दर्शन आटपून परत एसटीपशी थोरात कंडक्टराची ओवी ऐकत बसायची पण दर्शन झाले परत चला असं कोणीही म्हणत नव्हते कारण तशी ओवी जोरात चालायची व लोक तलीन होत होते ते स्वतःहून ओवी बंद करायचे असे जुने लोक म्हणतात, समाजाला ओवीतून जागृत केलेच पण ओवीस महाराष्ट्रात कॅसेट सम्राट म्हणून त्याकाळी प्रसिद्ध होते.. सुबंरान हे काय आहे हे सर्वांना समजावून सांगीतले. बबन अण्णांनी यशवंत सेना धनगराचा क्रांतीसुर्य बि.के कोकरे साहेब यांच्या बरोबर सांगली सातारा जिल्ह्यात काम केले आहे व बोरगांवचा ढाण्य वाघ बापू बिरू वाटेगांवकर यांच्या सोबत सामाजिक कार्यात नेहमी सहभागी असायचे शाहिर बबन थोरात हे ओवी पुरते मर्यादित नसून त्यांनी त्याकाळी मेंढपाळाना चराव कुरणे राखीव व्हावीत म्हणून त्यांनी आटपाडी, जत, कवठेमहकाळ, तासगाव, इस्लामपूर व इत्यादी तहसील कार्यालयावर अंदोलन व मोर्चा काढले होते त्यांची मेंढ्यपाळाशी वेगळीच नाळ होती, त्याच बरोबर धनगर आरक्षण बद्दल त्यांनी प्रत्येक वेळोवेळी पुढाकार घेतला होता मि एवढेच सांगीन की बबन (आण्णा) ओवीकाराना व समाजाला आज तुमची गरज होती .......! - व्हिजन माझा_सुरेश कचरे धनगरी ओवीचे युट्युब चॅनेल [email protected] विशेष सहकार्य - मा.अर्जुन बबन थोरात

Comment