MENU

Fun & Interesting

सुंदरवाडीची सुंदर भटकंती | सावंतवाडीतील खास ठिकाणं | शेतातला पळसाचा चहा

Mukta Narvekar 94,008 12 months ago
Video Not Working? Fix It Now

सर्वोदय इको होमस्टे - https://www.booking.com/Share-Ah3TTS5 +91 94200 81501 सावंतवाडी म्हणलं की डोळ्यासमोर येतात रंगीबेरंगी लाकडी खेळणी, गंजिफाचे वेधक रंग, मोती तलाव आणि राजवाड्याचा शांत परिसर. सावंतवाडी फिरताना या सगळ्या गोष्टींचा आनंद घेतलाच शिवाय मोती तलावापाठी असणाऱ्या हिरव्यागार नरेंद्र डोंगरावरही गेले. डोंगरावर जाऊन मस्त नेचर trail केली. पाऊण तासाची नागमोडी वाट. शिशिर ऋतूचा सोहळा अनुभवायला मिळाला तिथे. सकाळी हलकी हलकी थंडी होती. झाडं आपली पानं गाळून वृक्षकळा दाखवत होती. निसर्गशिल्प स्पष्ट दिसत होती. मचाणीवरून धुक्यात हरवलेली सावंतवाडी बघितली. खूप सुंदर अनुभव होता. अजून एक सुंदर अनुभव मी तिथे घेतला. मी सावंतवाडीत ज्या होमस्टे मध्ये राहिले होते, त्या होमस्टेचे host natural farming करतात. दुपार त्यांच्या शेतावरच घालवली. संध्याकाळी पळसाचा चहा केला. सूर्यास्त बघत चहा पिला आणि उकडलेली कणगी खाल्ली. मनाला आराम मिळाला तिथे. हा सगळा अनुभव एपिसोड मधून शेअर केला आहे. नक्की बघा. The music in this video is from Epidemic Sound https://www.epidemicsound.com/referral/0vjd9y Cinematography And Editing Rohit Patil And Sayali Mahajan Follow me on Insta https://www.instagram.com/mukta_narvekar My fb page https://www.facebook.com/MuktaNarvekarVlogs/?modal=admin_todo_tour

Comment