मंडळी कोकणात आल्यावर पहिल्यांदाच शनिवार रविवारची सुट्टी मिळाली होती. ती आपण कशी घालवली हे आजच्या भागामध्ये तुम्हाला बघायला मिळेल.
शनिवारी संध्याकाळी आपण घराभोवतील परिसराचा छोटासा सैरसपाटा केला आणि नंतर बाजारात जाऊन घराभोवती झाडे लावण्यासाठी लागणारी शेतीची हत्यारे लांजातील लोहारांकडून विकत घेतली.
रविवारी सकाळी लवकर उठून लांजाला एक मॉर्निंग ड्राईव्ह करून आलो आणि आपल्या झापडे गावात एक छोटासा सैरसपाटा गाडीनेच केला. त्यानंतर घरी येऊन आंबोळी आणि चहा अशी न्याहारी केली. हे सर्व तुम्हाला आजच्या भागात पाहायला मिळेल.
कोकणातील अशाच व्हिडिओ साठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद. आम्ही तुमच्या अभिप्रायाची वाट पाहतोय.
धन्यवाद.