1964 साली जायकवाडी प्रकल्पचा प्रस्ताव पूर्ण झाला, शासनाने मांडलेल्या प्रस्तावामध्ये खडकुली परिसरातील महानुभावीयांची असलेली संपूर्ण तीर्थस्थाने या प्रस्तावात नमूद करण्यात आली होती म्हणजेच हे सर्व तीर्थस्थाने या प्रकल्पात होणाऱ्या जलसाठ्यात कायमची जलमग्न होणार होती म्हणून तत्कालीन अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कैवल्यवासी आचार्य प्रवर महंत दिगंबर नागराज बाबाजी (छत्रपती संभाजीनगर) यांच्या प्रयत्नातून संपूर्ण जलमग्न होणाऱ्या तीर्थस्थळांचा एक माहितीपट शासनाने काढावा असा प्रस्ताव शासन दरबारी टाकण्यात आला शासनाने तो लागलीच मान्य करून महानुभाव पंथ" या माहितीपटाची निर्मिती केली त्या पुढे 18 ऑक्टोबर 1965 रोजी श्री लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते या धरणाची पायाभरणी झाली व पुढे 24 फेब्रुवारी 1976 रोजी भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या शुभहस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले व त्या दिवसापासून आमचे सर्व तीर्थस्थानी या धरणाच्या कुशीमध्ये कायमची विलीन झाली परंतु शासन निर्मित या माहितीपटाद्वारे आम्हाला आजही खडकुली परिसरातील संपूर्ण तीर्थस्थानांची मूळ स्थिती पहावयास मिळते..
आपल्या परिसरातील सर्व उपदेशी मंडळीला शेअर करा