वाघ्या कुत्र्याची समाधी ही रायगडवर कशी आली?
वाघ्या कुत्र्याची समाधी हा मुद्दाच मुळात वादग्रस्त आहे . तरीही या प्रशनाच्या उत्तरात जाणण्याचा आपण प्रयत्न करूयात. मित्रांनो वाघ्या कुत्र्याच्या याविषयावर अनेकदा चारच्या होते परंतु त्याचा शिवकालीन लिखाणात किंवा बखरीमध्ये साधा उल्लेख हि सापडत नाही.. तरीही या विषयाची चारच्या कायम होत असते..
त्याचप्रमाणे या वाघ्या कुत्र्याच्या विषयावर अनेक आख्यायिका सुद्धा तयार झाल्या आहेत परंतु त्याच्या सत्तेबाबत हि मी येथे पुष्टी करत नाही .. परंतु या कथा गंमतीदर वाटल्याने तुमच्या सोबत शेअर करीत आहे ..
काही लोकांचे असे म्हणणे आहे की वाघ्या नावाचा कुत्राच अस्तित्वात नव्हता.. असे ही सांगीतले जाते की या कुत्र्याची समाधी १९३६ मध्ये उभारण्यात आली.. म्हणजेच रायगडावरील छत्रपतींच्या समाधीच्या जिर्णोद्धारा नंतर तब्ब्ल ९-१० वर्षांनीं ..
असे हि सांगीतले जाते की, समाधी जिर्णोध्दारा साठी जी स्मारक कमिटी उभारण्यात आली होती याच स्मारक कमिटीने १९३६ पासून तब्बल १० वर्षांनंतर सुद्धा समाधी जिर्णोध्दारा साठी देणग्या जमिविणे थांबविले नव्हते.. अनेक संस्थानिक राजांकडेही हे लोक जावून वर्गणी उकळत असत.. ..
आणि अशांच प्रकारे हे लोक एकदा इंदौरच्या होळकरांकडे गेले .. प्रथम होळकरांनी यांना टाळले कारण सांगताना सांगीतले की इंगलंडची राणीच्या कुत्र्याच्या मृत्यु झाल्यामुळे मी सुतकात आहोत. त्यामुळे देणगी मिळणार नाही परंतु.. स्मारक कमिटी मधील काही लोक हट्टी होते त्यांनी होळकरांची भेंट घेवूनच जाणार असे सांगीतले.. असे म्हंटले जाते कि नंतर होळकरांनी त्यांना बोलण्यास सांगितले.. त्यावेळी राणीच्या कुत्र्या बाबत विचारपुस झाली तेव्हा राणीचा Tiger नावाचा कुत्रा मरण पावला असुन त्यामुळे राणी शोकांत आहे या परिस्थितीत निधी देणे योग्य नाही हा खुलासा झाला
यांवर स्मारक कमिटी ने सांगितलेकी आम्ही कुत्र्याची समाधी बांधू राणीला ही बरे वाटेल व रायगडाच्या जिर्णोध्दारास ही आपला हातभार लागेल हा प्रस्ताव होळकरांना पटला आणि त्यांनी समाधी साठी निधी दिला अशी हि आख्यायिका आहे.. मित्रांनो या कथे संबंधित माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता इंदौरचे होळकर हे दानशूर व्यक्ती होते व त्यांनी रायगडाच्या जिर्णोध्दारास कुठलीही अट नघालाता सढळ हाताने देणगी दिली आल्याचे वाचण्यात येते. .
रायगडावर वाघ्या कुत्र्याची मूर्ती उभारल्यानंतर पुन्हा एक नवीन आख्यायिका तयार झाली ती अशी कि शिवाजी महाराजांचा एक अतिशय लाडका कुत्रा जो स्वामी समर्थ यांच्या कडून आणला होता ज्या वेळी महाराजांना अंत्यविधीसाठी पालखीतून णले त्यावेळी हा कुत्रा सोबत होता
महाराजांना अग्नी देत आहेत हे पाहील्याने कुत्र्याने अग्नीत उडी मारली व महाराजांसोबत तोही या पंचमहाभुतांत विलीन झाला .. या प्रकारे अख्यायीका सादर करण्यात आली नंतर Tiger हे नाव लोक स्विकारणार नाहीत म्हणून त्याचे नाव वाघ्या असे ठेवण्यात आले.
मित्रांनो या या व इतर दंतककथेत आहेत परंतु या कथेत किती सत्यता आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला असता आपल्याला स्प्ष्ट असा ऐतिहासिक दाखले सापडत नाही .. परंतु या दंत कथेप्रमाणे खरंच वाघ्याचे अस्तित्व असेल कदाचित त्याचा उल्लेख तात्कालीन लिखाणात जरूर आला असता आणि वाघ्या खोटा आहे असे गृहीत धरले तर रायगडावर त्याची मूर्ती आली कशी ? हे प्रश्न अनुउत्तरितच राहतात
तुम्हाला जर या विषयी काही अधिक माहिती असेल तर मला खालील कॉमेंट्स बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका.