हवेली दौंडसह पुणे जिल्हापासुन सोलापुर ते थेट कर्नाटातील इंडीपर्य़ंत अप्पा लोंढे यांचे नाव उच्चारले तरी, अनेकांचे कान टवकारतात. कारण 1990 पासून ते थेट 2015 प्रर्यंत अप्पा लोंढे यांची बारामती, दौंड, हवेलीसह जिल्हा व परिसरामध्ये प्रचंड दहशत होती. 1990 पासून गुन्हेगारी क्षेत्रात असणाऱ्या लोंढेवर खून, खुनाचे प्रयत्न, जमिनीची लुबाडणूक यांसारखे पन्नासहून अधिक गुन्हे दाखल होते. काही वर्षांपूर्वी अप्पावर मोक्का व टाडा या कायद्या अंतर्गत कारवाईही करण्यात आली होती. पन्नासपैकी चार गुन्ह्यांमध्ये त्याला शिक्षाही झाली होती. वाळु व्यवसायातील बेताज बादशहा म्हणुन ओळख झालेल्या अप्पा लोंढे यांच्या टोळीने 1990 पासून ते थेट 2015 अशी तब्बल पंचविस वर्षाहुन अधिक काळ पुण्याचे गुन्हेगारी क्षेत्र गाजवले. आजच्या व्हिडिओत आपण हवेली दौंडसह पुण्याला हदरवणारा गॅंगस्टर अप्पा लोंढे याच्याबद्दल जाणून घेणार आहोत.
#pune #appalondhe #crime #ganagster