बिना तेलाचे लिंबू मिरची साहित्य -
एक किलो लिंबू.
पाव किलो हिरवी मिरची.
50 ग्रॅम मीठ (म्हणजेच पोह्याचे तीन चमचे, लिंबू मिरचीला मुरायला ठेवण्यासाठी.)
पाव चमचा हळद.
100 ग्रॅम तयार लिंबू मिरची लोणचे मसाला.
(जर लोणचे मसाल्यामध्ये मीठ असेल तर जास्तीचे मीठ मसाल्यात टाकू नये. आणि जर लिंबू मिरची मसाल्यात मीठ नसेल तर छोटा एक ते दिड चमचा मीठ घेणे.)
जर तुम्हाला या लोणच्यामध्ये तेल हवं असेल. तर एक ते दिड वाटी तेल कोमट करून ते थंड करून मग लोणचे मध्ये टाकने.