महाराष्ट्राच्या लोकनाट्य तमाशा परंपरेत ज्यांनी १९६० नंतर कनाततील्या तमाशात आपल्या नावाचा डंका एका वेगळ्या प्रकारे उमटविला त्या विनोदसम्राट गुलाब बोरगावकर, दत्ता महाडिक पुणेकर,चंद्रकांत ढवळपुरीकर आणि गणपत व्ही. माने चिंचणीकर हे होत. आपल्या वेगवेगळ्या तमाशा फडातून आपली स्वतःची एक वेगळी ओळख या चौघानी निर्माण केली.
अशाच एका १९८२ साली नव्याने उदयास आलेल्या 'संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर सह गुलाबराव बोरगावकर लोकनाट्य तमाशा' हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा अवजड वाहनांचा तमाशा म्हणून ओळखला गेला. याच तमाशात जी वगनाट्ये गाजली त्याचा आढावा मुबारक बोरगावकर यांनी येथे घेतला आहे. त्यानंतर गुलाबराव यांचा मृत्यू आणि महाडिक अण्णांनी पुढे दीर्घकाळ चालवलेला तमाशा फड एक वैशिष्ट्य होते. इथे तमाशात काम केलेले गुलाब मामांचे चिरंजीव मुबारक बोरगावकर यांनी आपल्या साऱ्या आठवणी येथे सांगितल्याआहेत.