स्वतःच आयुष्य ज्यांनी वनस्पती शास्त्राचा अभ्यास आणि पर्यावरण रक्षणासाठी समर्पित केलं. आयुष्यात एक दिवसही विज वापरली नाही. संपुर्ण जिवण निसर्गाच्या सानिध्यात, पशू, पक्षी, झाडं, वनस्पतींसोबत घालविली. त्या प्रा. डॉ. हेमा साने यांनी वड, उंबर, पळस, अशोक अशा विविध वृक्षांचे वनस्पतींचे ऐतिहासिक, धार्मिक, आध्यात्मिक, व्यवहारीक संदर्भ उलगडून सांगितले आहेत. प्राचीण काळापासून जेव्हा विज्ञान विकसीत झाले नव्हते तेव्हापासून वृक्षांना असणारे महत्त्व. वृक्षांना देव समजणे ही संकल्पना आणि त्यामागील जनतेच्या भावना काय होत्या हे ऐतिहासीक संदर्भाच्या माध्यमातून त्या पटवून दिले आहे.
वृक्षांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी एक –एका देवासोबत एका वृक्षांची सांगड घालणं, महादेवाचा - वड, विष्णूचा - पिंपळ आणि ब्रम्हदेवाचे - पळस हे झाड कसे झाले याचे धार्मिक संदर्भ. 28 बुद्धांचे 28 बोधीवृक्ष, 24 तिर्थंकरांचे 24 चैत्य वृक्ष, 27 नक्षत्रांचे 27 आराध्य वृक्ष आहेत. या मागील भूमिका ही की या वृक्षांना देव म्हणा आणि त्यांचे रक्षण करा जशी आताच्या काळातील झाडे लावा झाडे जगवा ही आहे. वृक्षाच्या संरक्षणासाठी त्याला धार्मिक रंग देण्यात आले ज्यामधून त्यांचे संरक्षण होईल. अशा विविध वनस्पतींची वृक्षांची माहिती प्रा. हेमा साने यांनी दिली.