MENU

Fun & Interesting

कच्च्या / कोवळ्या फणसाची भाजी । भाजीसाठी फणस नेमका कसा साफ करावा यासाठी टिप्स | Raw Jackfruit Sabzi

Gharcha Swaad 1,532,399 6 years ago
Video Not Working? Fix It Now

How To Make Rwa Jackfruit Sabzi At Home | How To Clean Jackfruit | फणसाची भाजी | Fansachi Bhaji | Recipe By Gharcha Swaad OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 https://www.youtube.com/user/mihaykoli साहित्य - साधारण १ ते १½ किलोचा कच्चा/ कोवळा फणस, १ tsp घरगुती गरम मसाला, ३ tblsp घरगुती लाल मसाला, ½ tsp हळद, १ tsp जीरे, चिमूटभर हिंग, ३ तेजपत्ते, ३ हिरव्या मिरच्या, ½ कप ओल्या नारळाचे काप, ½ कप सुक्या खोबऱ्याचे काप, २ कांदे काप केलेले, ७/८ कडीपत्त्याची पाने, १" आले, ७/८ लसूण पाकळ्या, १ tblsp ठेचलेले लसूण, मूठभर कोथिंबीर, ½ कप तेल आणि चवीनुसार मीठ. फणस साफ करण्यासाठी - एक लिंबू आणि गरजेनुसार तेल. 👉🏽 स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - https://youtu.be/EOQ4uKB3r8g 👉🏽 घरगुती पद्धतीचा स्वादिष्ट असा आगरी कोळी मसाला | Traditional Masala - https://youtu.be/5v2dGKKHXAM कृती - प्रथम वरील व्हिडिओमध्ये दाखविल्या प्रमाणे फणस साफ करून घ्यावा, त्याचे तुकडे करून घ्यावे आणि स्वच्छ धुवून घ्यावा. आता कुकरमध्ये २ ग्लास पाणी घालून यात फणस घालावा आणि २ शिट्ट्या घेऊन उकडवावा. (कुकरमध्ये फणसासोबत थोडी हळद आणि १ tsp मीठ घातले तरीही चालेल, फक्त भाजी तयार करताना मिठाचा अंदाज चुकू नये म्हणून हि सोप्पी पद्धत दाखविली आहे. ) एका भांड्यात २ tblsp तेल तापवून त्यात एक चिरलेला कांदा, ओल्या नारळाचे काप, सुक्या खोबऱ्याचे काप, आले, लसूण पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या तांबूस रंगावर परतून घ्याव्या. परतून झालेलं साहित्य थंड करून मिक्सर मध्ये कोथिंबीर आणि परतलेले साहित्य घालून यात थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्यावे. आता पुन्हा भांड्यात ५ tblsp तेल गरम करून यात फोडणीला जीरे, तेजपत्ते, हिंग, कडीपत्त्याची पाने आणि चिरलेला कांदा घालून हलका सोनेरी रंगावर पेरून घ्यावा. परतून झाल्यावर यात घरगुती गरम मसाला, घरगुती लाल मसाला, tsp हळद, घालून हलके परतावे. परतून झाल्यावर यात तयार केलेले वाटण घालून वाटणातुन तेल बाजूला होईपर्यंत सतत परतत राहावे. परतून झाल्यावर यात उकडलेला फणस त्याच्या पाण्यासोबत घालावा आणि मसाल्यात चांगला घोळून एकजीव करावा. आता वर झाकण ठेवून ५ मिनिटे वाफ काढावी. ५ मिनिटानंतर यात १ ग्लास रस्स्यासाठी पाणी घालावे. ( जर भाजी सुकी हवी असेल तर यात पाणी थोडे घालावे किंवा नाही घातले तरीही चालेल. ) आता मीठ घालून पुन्हा चांगले एकजीव करून घ्यावे. आता वर पुन्हा झाकण ठेवून ५ मिनिटे वाफ काढावी. ५ मिनिटानंतर गरमागरम फणसाची भाजी चपाती किंवा भाकरीसोबत वाढावी. धन्यवाद ! #fansachibhaji #rawjackfruitsabzi #kokanspecialfood If you liked the video, Please Like & Share. ................................................................................................................. Follow Us On Instagram 👉 https://www.instagram.com/gharcha_swaad/ Follow Us On Facebook 👉 https://www.facebook.com/gharcha.swaad For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]

Comment