सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांना स्व. बाबासाहेब (भाऊ) आकात स्मृती पुरस्कार प्रदान!
परतूर,दिनांक 9 मार्च 2025 रविवार
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, परतुर च्या वतीने दिला जाणारा स्व.बाबासाहेब (भाऊ) आकात स्मृतीपुरस्कार महाराष्ट्रातील नामवंत सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांना प्रदान करण्यात आला. लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये या भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
शिक्षण तथा सहकार महर्षी स्व.बाबासाहेब (भाऊ) आकात यांच्या जयंतीचे औचित्य साधून या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
सिनेअभिनेते अनासपुरे यांनी भाऊंच्या कार्याचा गौरव केला तसेच भाऊ हे कलावंताच्या पाठीमागे उभे राहणारे जानते नेते होते असे प्रतिपादन केले तसेच भाऊंना अपेक्षित असलेले त्यांचे कार्य त्यांचे दोन्ही चिरंजीव कपिल आकात आणि कुणाल आकात हे नेटाने पुढे चालवत आहे याचा मनस्वी आनंद होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या समारंभास मुख्य सत्कारमूर्ती तथा सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. विजय फुलारी, संस्थेचे सचिव कपिल भैया आकात, संस्थेचे उपाध्यक्ष कुणाल दादा आकात, विलास भाऊ आकात, कवि दासु वैद्य, प्राचार्य, प्रा. रंजीतसिंह निंबाळकर, प्राचार्य डॉ.भागवत कटारे, अधिसभा सदस्य प्रा. डॉ.भास्कर साठे, प्राचार्य डॉ. शिवाजी मदन, प्रा. डॉ.मुंजा धोंडगे, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत खंदारे सर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ तथा जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
All rights reserved - Ⓒ Marathi Tadka
Please Like, Share and Subscribe - Marathi Tadka
☛ You tube : https://www.youtube.com/c/MarathiTadkaOfficial
☛ Facebook : https://www.facebook.com/marathitadkaOfficial
☛ Instagram : https://www.instagram.com/marathitadka_official
☛ Twitter : https://twitter.com/marathitadkaa
☛ Website : http://marathitadka.com/
☛ Write us : [email protected]
☛ फक्त कीर्तनाच्या शुटींग करिता किंवा प्रोमोशन साठी Marathi Tadka Whatsapp : 8100007744
Thank You!!