MENU

Fun & Interesting

चंबळ खोऱ्यातील डाकू रामसिंग आणि टोळ्यांचा बंदोबस्त करणारी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! #crime #news

Video Not Working? Fix It Now

राजस्थान व मध्यप्रदेश या राज्यांच्या सीमेवरील विंध्य पर्वत रांगांच्या घनदाट जंगलातून दिवसा माणसं जायला घाबरत. करणंही तसंच होतं. या भागात असणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळ्या. त्यातील रामसिंग गुज्जर याच्या टोळीने चंबळ खोऱ्यात हाहाकार माजवला होता. जेवणात भाकरीसोबत कांदा का दिला नाही, म्हणून त्याने एका शेतकरी दांपत्याचा निर्घृण खून केला.डाकू रामसिंगने गुज्जर अनेक लग्नवराती लुटल्या होत्या. नवरीला पळवून नेऊन तिच्यावर तो अत्याचार करायचा.सुरजो नावाची एक नवरी त्याने पळवली. आश्चर्य म्हणजे नंतर हीच सुरजो रामसिंगच्या प्रेमात पडली आणि शेवटपर्यंत त्याची सावली बनून राहिली.पुढे 2002 साली आयपीएस दिनेश एम एन यांनी सवाई माधवपूर जिल्ह्याचे SP म्हणून सूत्रे हाती घेतली. त्यांनीच रामसिंगचे एन्काऊंटर केले. राजस्थान मधील गँगवार संपवताना श्री दिनेश यांनी आनंदपाल, सुरज माली, बलविर बानोडा, राजू टेहड यांसारख्या गुंडांना वठणीवर आणलं. #news_ #crime #ips #police #dineshmn #ramsinggujjar #anandpalsingh #balvirbanoda #rajutehad #chambal #dacoit3 #facts #rajastannews https://youtu.be/gcDcWwawM9A https://youtu.be/2fPCtOwKfmo

Comment