"अलिबाग" चा मसाला ५ किलो मिरची च्या प्रमाणात वर्षभरा पेक्षा जास्त टिकणारा रंग,चव संपे पर्यंत न बदलता
"अलिबाग" चा मसाला ५ किलो मिरची च्या प्रमाणात वर्षभरा पेक्षा जास्त टिकणारा रंग,चव संपे पर्यंत न बदलता#अलिबागचामसाला #घरगुतीमसाला#masala#mixmasala #garammasala #bhajakamasala#भाजकामसाला#malwanimasala #मालवणीमसाला#कोकणीमसाला
टीप:
१)मसाला टिकवण्या साठी त्यात खडा हिंगा चे तुकडे टाकून ठेवणे.
२) मसाला हवा बंद डब्यात भरून ठेवणे.
३) मसाला तय्यार झाल्या नंतर त्यात सांगितल्या प्रमाणे तेल मिक्स करणे म्हणजे रंग चांगला येतो.
४)मसाला कमीत कमी २ ते ३ दिवस उन्हात वाळवून घेणे.
५) सगळा मसाला मंद ते मध्यम आचेवर न करपता
भाजून घेणे.
६)छोट्या छोट्या पुड्या किंवा पॅकिंग करून ठेवला की संपे पर्यंत चव आणि रंग बदलत नाही.
५ किलो आणि १ किलो दोन्ही प्रमाणात
(५ किलो मिरचीचा मसाला प्रमाण :)
२ किलो रेलिश मिरची
१ किलो काश्मिरी मिरची
१ किलो बेडगी मिरची
१ किलो तेजा मिरची
१ आणि १/४ किलो धणे
३/४ किलो जिरे
१ किलो राई (मोहरी)
१/२ किलो हळद ( सेलम)
१०० ग्रॅम हिंग
१०० ग्रॅम काळीमिरी
१०० ग्रॅम शहाजिरे
१००ग्रॅमचक्रिफुल
(बादियान)
१०० ग्रॅम चिरफळ
१०० ग्रॅम लवंग
१०० ग्रॅम दालचिनी
१०० ग्रॅम मसाला वेलची
१०० ग्रॅम बडिशेप
५० ग्रॅम खसखस
५० ग्रॅम नाकेसर
५० ग्रॅम मायपत्री (जायपत्री)
५० ग्रॅम तेजपत्ता (तमालपत्र)
४ जायफळ
२० ग्रॅम हिरवी वेलची
२० ग्रॅम दगडफुल
५० ग्रॅम तेल गरम करून थंड केलेले.
(१ किलो मिरचीचा मसाला प्रमाण)
१/४ किलो रेलिश मिरची
१/४ किलो काश्मिरी मिरची
१/४ किलो बेडगी मिरची
१/४ किलो तेजा मिरची
१/४ किलो धणे
१५० ग्रॅम जिरे
१/४ किलो राई (मोहरी)
१०० ग्रॅम हळद ( सेलम)
२० ग्रॅम हिंग
२० ग्रॅम काळीमिरी
२० ग्रॅम शहाजिरे
२० ग्रॅम चक्रिफुल
(बादियान)
२० ग्रॅम चिरफळ
२० ग्रॅम लवंग
२० ग्रॅम दालचिनी
२० ग्रॅम मसाला वेलची
२० ग्रॅम बडिशेप
१० ग्रॅम खसखस
१० ग्रॅम नाकेसर
१० ग्रॅम मायपत्री (जायपत्री)
१० ग्रॅम तेजपत्ता (तमालपत्र)
१ जायफळ
५ ग्रॅम हिरवी वेलची
५ ग्रॅम दगडफुल
१० ग्रॅम तेल गरम करून थंड केलेले.