श्री गणेश जयंती निमित्त अखंड हरीनाम सप्ताह, पंचपरमेश्वर शिवमंदिर, नारायण पाटीलवाडी , सावरकर नगर ठाणे ( प ) येथे पौष कृ १४ रविवार दि . २९ जानेवारी २०१७ रोजी परम पूज्य सदगुरु श्री चैतन्य महाराज देगलूरकर ( श्री क्षेत्र पंढरपूर ) यांचे हरिकीर्तन यथासांग पार पडले.
निरुपनासाठी घेतलेला अभंग हा जगतगुरु संत तुकाराम महाराज्यांचा असा हा अत्यंत प्रसिद्ध चरणाचा आहे. या अभंगातून तुकाराम महाराज्यांच्या संतांच्या पायाची माती आणि संतांच्या मुखातील उच्छिष्ट या दोन
साधनांनी मानवी जीवनांवर कल्याण कसे होते हे आपल्या समोर ठेवले आहे .
संत मार्गी चालती । त्यांची लागो मज माती ।।
काय करावीं साधनें । काय एक नव्हे तेणें ॥
शेष घेईन उच्छिष्ट । धाय धणीवरी पोट ॥
तुका ह्मणे संतां पायीं । जीव ठेविला निश्चयीं ॥