जागतिक लोकशाहीची सद्यस्थिती: डॉ नरेंद्र दाभोळकर विवेक व्याख्यानमाला, नाशिक
सुमारे २५-३० NGOs एकत्र येवून दरमहा २० तारखेला एका विषयावर पाहुण्यांचे व्याख्यान ठेवतात. हा उपक्रम गेले ३५ महिने अव्याहत चालू आहे. डॉ नरेंद्र दाभोळकर आणि श्री गोविंद पानसरे यांच्या पुरोगामी विचारसरणीने प्रेरित होवून युवा व्याख्यानमालेद्वारे समाज प्रबोधनाचे कार्य ही मंडळी करीत आहेत. वैचारीकदृष्ट्या आजच्या अत्यंत प्रदूषित वातावरणात जनसामान्य आणि इन्फ्लुएन्सर्स च्या माध्यमातून ते निस्पृहपणे करीत असलेले कार्य आजच्या काळात वाखाणण्यासारखे आहे.