MENU

Fun & Interesting

वसईचा दूधवाला एक माहितीपट - भाग २

Sunil D'Mello 43,579 4 years ago
Video Not Working? Fix It Now

वसईचा दूधवाला एक माहितीपट - भाग २ पहिल्या भागात आपण पाहिले की आम्ही वसईकर कशाप्रकारे मुंबईला बरीच वर्षे दूध पुरवायचो. वसईकरांचा हा पारंपरिक दुग्धव्यवसाय पुढील पिढी कशाप्रकारे पुढे नेत आहे हे आपण ह्या भागात पाहणार आहोत. पुरुषांची मक्तेदारी असलेला हा व्यवसाय एक महिला गेली दहा वर्षे समर्थपणे पाय रोवून कशाप्रकारे करत आहे हे आपण पाहणार आहोत. हॉटेल मॅनेजमेंट केलेले व मर्चंट नेव्हीतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी करणारे दोन तरुण आधुनिक पद्धतीने हा व्यवसाय करत आहेत. थेट हरियाणा वरून आणलेल्या म्हशी. तब्बल दोन एकर जमिनीवर लावलेला 'नेपियर' नावाचा विशिष्ट चारा. काचेच्या बाटलीत पोहोचवले जाणारे दूध. गोठ्यातील तापमान सुसह्य राहावे म्हणून केलेली अत्याधुनिक व्यवस्था. म्हशींना २४ तास पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी असलेली यांत्रिक व्यवस्था... एक ना अनेक अचंबित करणाऱ्या गोष्टी असलेला 'बसिन हेरिटेज फार्म' देखील आपण पाहणार आहोत. आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद. छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो वसई हेरिटेज फार्म, भुईगाव कॉलिन: ९७६४० ४०९८९ वसईवरील आमचे इतर व्हिडीओ वसईचा दूधवाला एक माहितीपट - भाग १ https://youtu.be/s20uejgeFz4 वसईचा केळीवाला - एक माहितीपट https://youtu.be/mwV8UATbBjg वसईतील पानवेल - विड्याची पानं https://youtu.be/cr_uRWPxmVI मातीच्या तव्यावरील तांदळाच्या भाकऱ्या https://youtu.be/pwcC1O6kmTo वसईच्या ऑर्किडची कहाणी https://youtu.be/Tp9xrocunXY सफर वसई किल्ल्याची https://youtu.be/4VvWzXEo-J4 प्राचीन वसईचा इतिहास https://youtu.be/w0BfNlSmOPI वसईतील बैलगाडीवाले शेतकरी https://youtu.be/jgI_O6lOCvk #vasaiculture #vasaichadoodhwala #vasaidocumentary #sunildmello #basseinheritagefarm

Comment