MENU

Fun & Interesting

लग्नात लग्न (भाग आठवा) | देवक बसविणे | भन्नाट विनोदी कथा | लेखिका नीलिमा क्षत्रिय

Nilima Kshatriya 449 2 weeks ago
Video Not Working? Fix It Now

लग्नात लग्न (भाग आठवा) | देवक बसविणे | भन्नाट विनोदी कथा | लेखिका नीलिमा क्षत्रिय तिथून पुढे मग टेलरच्या चकरा. मुली, बायकांच्या तोंडी येऊन जाऊन, अस्तर, शिलाई, बुटीक हेच शब्द घोळू लागले. फिटिंग, ट्रायल, ड्रेस - ब्लाऊज नीट बसणे, बिघडणे, बुटीक वालीच्या नावाने ठणठण करणे, सगळं व्यवस्थित सुरू झालं. मुली मधूनच कुठलं तरी बोचकं घेऊन कुठेतरी उन्हाताना फिरून येऊ लागल्या. घरात सगळा पसारा पसारा दिसू लागला. मेंदीवाली, बांगडीवाली ठरवणे ही कामे मुलीच गाडीवरून पार पाडून येऊ लागल्या. स्वयंपाक वाली ठरवायला मात्र सुनिता सासूला आणि नवऱ्याला घेऊन गेली. देवक बसवले की कार्यालयात जाईपर्यंत, दोन्ही वेळेची जेवणं, दोन्ही वेळचा चहा, सकाळचा नाश्ता सगळं करायला एक मावशी ठरल्या. देवकचा स्वयंपाक मात्र आचाऱ्याला दिला होता. देवक बसले की लगेच दोन दिवसांनी लग्न होतं. देवकाच्या दिवशी सकाळपासूनच एक एक करून गावोगाव चा पाहुणा येऊन पडू लागला. कोणी पुण्याहून, कोणी सासवडहून, कोणी पिंपळगाववरून तर कोणी मुंबईहून. प्रत्येक गावचे पाहुणे आले की एकदा मोठा कला होई. सगळे गळ्यात पडत. " अगं बाई, बबलू का? किती मोठा दिसायला लागला गं? " " मग मोठा नाही दिसणार का? बघा आता ही मामी, तुझ्या राहुल बरोबरचाच नाही का? " " नाही हो, तो मोठा आहे. स्वातीच्या लग्नात तो चालत होता. आदल्या दिवशी नाही का हरवला होता. " "हो बाई, काय आत्राप होतं पोरगं, मिनिटभर गप्प म्हणून बसायचं नाही. " " हो ना यांच्याजवळ दिलं होतं पाच मिनिटं, तर दिलं सोडून खाली खेळायला. जे गायब झाला, तर पार त्या आचा-यांच्या खोलीत सापडला, लाडू खात बसला होता.ते ही नागडाच.. " राहुलला ते ऐकून काय बोलावं तेच कळेना. तो आपला पाहुण्यांचे सामान समोरच्या रिकाम्या फ्लॅटमध्ये मित्रांच्या सहाय्याने वाहण्यात मग्न होता. प्रत्येक लग्नकार्यात असे एखादं शेजाऱ्याच रिकामं घर सापडतंच, तिथे चेपली जातात. तिकडे गाडी बबलूच्या वयावरून आता सोनीच्या लग्नाकडे शिफ्ट झालेली होती. सोनी तो विषय टाळायला बघत होती. मग म्हाताऱ्यांच्या तब्येतीची, नवरीच्या खरेदीची चौकशी झाली. चहापाणी झालं. हे पाहुणे पुढच्या फ्लॅटमध्ये डालेपर्यंत दुसरे मुंबईचे पाहुणे येऊन धडकले. सुनिताचं माहेरचे, सासरचे या कॅटेगरीप्रमाणे सगळ्यांशी पेश येणं चाललं होतं. हळूहळू पुढचा फ्लॅट पण फुल झाला. प्रत्येक खोलीत त्या त्या गावच्या पाहुण्यांनी बस्तान बसवलं. इकडे आचा-यासाठी गच्चीवर आडोसा करून दिलेला होता. त्याची माणसं एकेक करून स्वयंपाकाची तयारी करत होती. त्याच्यावर देखरेख करायला पिंपळगावची एक चबढबी म्हातारी बसवून दिलेली होती. ती नको त्या सूचना देऊन आचा-याच्या तोंडाला फेस आणत होती. काम चुकार मंडळी कामाच्या ठिकाणापासून लांब लांब पळत होती. कोणी खूप महत्त्वाच्या चर्चेत असल्याचं भासवत होतं, तर कोणी स्वतःचं वर्षा- दीड वर्षाच्या लहान मुलामागे तास तास कालवलेला वरण-भात घेऊन फिरत टाईमपास करत होती. सगळे खूप कामात असल्याचं दाखवत तर होते पण कामाला कुठल्याच हात म्हणून लावत नव्हते. इकडे खाली जेवणाची तयारी झाली. दोन पंगती उठल्या. देवक बसले. सगळी कामचुकार मंडळी ताबडतोब तिथे हजर झाली. फोटोग्राफरच्या कक्षेत येईल अशी जागा नकळत पकडू लागली. नवरी ते सगळं सोडून लगेच पार्लरमध्ये पळाली. त्याआधी काही तज्ञ मध्यमवयीन तरूणी, तिला कोणतं फेशियल करावं, कोणता वॅक्स वापरावा, आयब्रोज किती जाड ठेवाव्यात याविषयी जबरदस्तीने विनामूल्य मार्गदर्शन करत होत्या. मेंदीवालीने तोपर्यंत इतरांची मेेंदी काढायला सुरुवात केली. सासवडची एक स्वयंघोषित हुशार, चौकस महिला तिच्या मेंदीचे डिझाइन्स तपासत होती आणि "माझा पण मेंदीचा कोर्स झालाय" असं सांगून तिच्यावर रोब झाडायचा प्रयत्न करत होती. बाकी कोणाला काही प्रॉब्लेम नव्हता, पण हिला मात्र डिझाईन्स फारच फुटकळ वाटत होती. ती आत जाऊन मेंदीवालीविरुद्ध सगळ्यांचे कान फुंकण्याचा प्रयत्न करत होती. पण तिचं कोणी मनावर घेत नव्हतं. तोपर्यंत संध्याकाळ होत आली. नवरी पण पार्लरमधून परत आली आणि आता ती देवदर्शनासाठी निघाली. तिच्याबरोबर कोणी जायचं याच्यावरून बराच राडा झाला. सुनीताच्या सासूला वाटत होतं नवरीच्या आत्याने म्हणजे तिच्या लेकीनेच जावं पण सुनीताने तिच्याबरोबर स्वतःच्या भाचीला पण बळजबरीने गाडीत बसवलं. अर्ध्या तासात नवरी परत आली, मग नवरी आणि तिची आई, मावशी यांची मेहंदी सुरू झाली कोणी म्हणत होतं, ' मला जास्त नको बाई', कोणी म्हणत होतं, 'मला कोपरापर्यंत काढ'. मेंदी वाली ठरवणारीच्या डोळ्यांचे इशारे बघत मेंदी काढत राहिली. लगेच एकीकडे हळद फोडायची तयारी झाली दोन-तीन कारभारणींनी हळदीचे सामान नवरीच्या आईकडून ताब्यात घेतलं. अशा कार्यक्रमात दोन-चार बायका कार्यक्रम टेक ओव्हर करण्यासाठी धडपडत असतात. त्यांच्यावर मात करत, कधी त्यांना सूट देत नवरीची आई कार्यक्रम पुढे नेत राहते. अशा कार्यक्रमात चेष्टा-मस्करी आणि उगीचच मोठमोठ्याने हसणं मस्ट असतं. इतर वेळेला एखाद्या जोकला कोणाच्या तोंडावरची रेषही हलली नसती, पण आता मात्र सगळ्या मोठमोठ्याने हसत सुटतात. खलबत्ता जातं, अशी स्वयंपाक घरातून हद्दपार होऊन अडगळीत गेलेली मंडळी आज मानाचं स्थान पटकावून बैठकीच्या खोलीत मधोमध विराजमान होतात. त्यांनाही आजकाल झेंडूच्या माळांनी सजवतात. जितकी जास्त सजावट तितका गृहिणीचा मान मोठा. #लग्नातलग्न #देवकबसविणे #विनोदीकथा #मराठीविनोद #मराठीकथा #नीलिमाक्षत्रिय #हास्यकथा #मराठीलग्न #मराठीकथाकथन #मराठीलेखिका #कथाकथन #nilimakshatriya #storytelling story telling storytelling

Comment