MENU

Fun & Interesting

चित्तडोहावरील आनंदलहरी - भावआस्वादन

SADGURUBODH 672 15 hours ago
Video Not Working? Fix It Now

*चित्तडोहावरील आनंदलहरी - भावआस्वादन* 'चित्तडोहावरील आनंदलहरी' या अप्रतिम ग्रंथाचे अल्पसे भाव-आस्वादन ! भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजांच्या 'शिवानन्दलहरी' या स्तोत्रातील अडतिसाव्या श्लोकावरील प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे यांच्या चार मार्मिक व रहस्योद्घाटक प्रवचनांचे संकलन असणारा 'चित्तडोहावरील आनंदलहरी' हा ग्रंथराज परमउदार शिवतत्त्वाचे सर्वांगीण स्वरूप सर्व बाजूंनी स्पष्ट करणारा आहे. साधक, अभ्यासक आणि उपासक अशा सगळ्यांनीच या ग्रंथाचा अभ्यास करणे हिताचे आहे. श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजांचा 'केवलाद्वैत सिद्धांत' अत्यंत सरल, सहजसोप्या आणि आकलनसुलभ शब्दांमध्ये या ग्रंथात सविस्तर समजावून सांगितलेला आहे. हे या ग्रंथाचे प्रधान वैशिष्ट्य म्हटले पाहिजे. या ग्रंथाला मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे दिला जाणारा २०१५ सालचा राज्यस्तरीय उत्कृष्ट संतवाङ्मय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. प्रस्तुत ग्रंथाची अधिक माहिती खालील लिंकवर जाऊन वाचता येईल. https://shreevamanraj.org/book_details.html?publication_no=215×tamp=1740498275023 ग्रंथ खरेदीसाठी कृपया श्रीवामनराज प्रकाशन कार्यालयाशी संपर्क साधावा. भ्रमणभाष : ९३२२६८३८२४ ईमेल : [email protected] वेबसाईट : https://shreevamanraj.org #bhaktiyog #mahayog #shaktipatyog #bhaktimarg #dnyaneshwari #sadhana #भक्तियोग #mahabharat #shireeshdadakawade #mahadev #shivshankar #shankaracharya #shivanandlahari #महादेव #शिवशंकर #शिवभक्ती #shivbhakti

Comment