MENU

Fun & Interesting

काळभैरवनाथांना सिध्दनाथ का म्हणतात? श्रीनाथ खरसुंडी कसे प्रकट झाले! Kharsundi siddhanath temple

Video Not Working? Fix It Now

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये काळभैरवनाथांना सिध्दनाथ का म्हणतात? व श्रीनाथ खरसुंडी कसे प्रकट झाले हे पाहणार आहोत. खारसुड सिद्धाची आख्यायिका सांगली : माणदेशाचे आराध्य दैवत आणि लाखो भाविकांचे श्रध्दास्थान म्हणजे खरसुंडीचा सिद्धनाथ. सांगली जिल्हातील आटपाडी तालुक्यामध्ये श्री खरसुंडी सिध्दाचे सुमारे ११२५ वर्षापूर्वीचे प्राचीन देवस्थान आहे.  या मंदिराविषयी एक आख्यायिका सांगितली जाते. भरत खंडामध्ये दक्षिण देशी प्रचंडासुर नावाचा असुरी वृत्तीचा राजा राज्य करत होता. तो आपल्या दुष्क्रुत्याने सर्वाना छळत असे. ब्रह्म देवाकडून अजिंक्य राहण्याचे वर प्राप्त केलेला होता. या वराचा दूरउपयोग करून तो देवासह सर्वाना त्रास देत होता. त्याचा त्रासाला भय भीत होऊन लोक ब्रह्म देव शिव आणि शंकराकडे गेले तेव्हा भगवान शंकराने आपल्या तिसऱ्या नेत्रातून भैरववास जन्मे दिला. सर्वे देव देवतांनी आपली दिव्य अस्त्रे भैरववाला दिली. भैरव सूर सैन्याचा सेनापती बनून पृथ्वीवरती आला आणि त्याने प्रचण्डासुराचा वध केला आणि तो तिथे राज्य करू लागला. नायबा या भक्ताचा भक्तीवर प्रसन्न होऊन भैरवनाथाने नायबाला त्याचा गायीचा खरवासातून प्रकट होणार असल्याचे द्रुष्टांत दिला. नायबाची गाय कपिली तिचा खारवासातून दोन पिंडींचा आकार प्राप्त झाला आणि त्यातून भैरव प्रकट झाले तेव्हा पासून हे क्षेत्र खर्वसपिंडी म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याचा अपभ्रमष होऊन या क्षेरास खरसुंडी हे नाव पडले. मंदिराची रचना हेमाडपंथी श्री सिध्दनाथांचे मंदीर दक्षिणाभिमुख, पुरातन आणि दगडी असून त्याचे बांधकाम हेमाडपंथी आहे. मुख्य प्रवेशद्वार, नगारखाना, सभामंडप, गाभारा आणि प्रदक्षिणा मार्ग अशी मंदिराची रचना आहे. मंदिरातील नगारखाना तर नक्षीकाम शैलीचा उत्कृष्ट नमुना असल्याचे याठिकाणी पहायला मिळते. मुख्य प्रवेशद्वार, नगारखाना, सभामंडप, गाभारा आणि प्रदक्षिणा मार्ग अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपावर पूर्वीचे पत्र्याचे छत आहे.  गाभार्‍यात पन्नास किलो चांदीने मढवलेल्या मखरामध्ये श्री सिध्दनाथ व बाळाईदेवीची मूर्ती आहे. शंकराच्या देवालयात नंदी असतो असा प्रघात आहे. परंतु या देवापुढे ज्या कालवडीच्या स्तनातून दूध निघून ‘खारसुड सिद्ध’ तयार झाले त्या गोमातेची सुंदरशी पितळी प्रतिमा आहे. या देवाची चैत्र वद्य द्वादशीला भरणारी चैत्र यात्रा वर्षतील महत्वाची यात्रा आहे. या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रसह कर्नाटक मधून देखील भाविक येतात. या यात्रेत सासनकाठ्या मिरवणूक आणि पालखी सोहळा पाहण्यासासारखा असतो. श्रींची विशेष कापडीपूजा आणि पत्रीपूजा गाभार्‍यावर सुमारे १५० फूट उंचीचे शिखर आहे. नवरात्र उत्सवामध्ये देखील दररोज वेगवेगळ्या प्रकारे पूजा बांधली जाते. त्यामध्ये घोडा,हाती,नाग,सिंह असे अनेक प्राणी वापरले जातात. या पूजा अशा प्रकारे बांधल्या जातात की बघणाऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटते. सशाची पारध माघ पौर्णिमेस परशुराम लोणारी या भक्ताची आठवण म्हणून “ सशाची पारध ” वाटली जाते.या सगळ्या वैशिष्ट्यांमुळेच खरसुंडीचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धनाथाच्या दर्शनाला जायलाच हवं.  ______________________________________________________________________________________________ ✰✰✰ For giving sponsorships Contact Email ☛ [email protected] ______________________________________________________________________________________________ #kharsundisiddhanath #siddhanath #temple #mandir #खरसुंडी_सिध्दनाथ #kalbhairav #kalbhairavtemple #jatra #kalbhairavmandir #chaitranavratri #yatra #marathimotivationandhistory सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.

Comment