खाडीत जाऊन मोठे शिपे काढले 😍| घरी येऊन बनवला शिपल्यांचा रस्सा - Ambavali, Mandangad (Konkan) आमच्या भारजा नदीच्या खाडीत वेगवेगळ्या प्रकारचे मासे मिळतात. खाडीत जाऊन आम्ही कालवा, खेकडी, कोलंबी, मासे, शिपे शिंपले पकडतो. या वेळेस आम्ही शिपे म्हणजे मोठे शिंपले काढायला वर्षा आणि मी गेलो होतो. आम्ही संध्याकाळी चार वाजता आमच्या घरातून निघालो. ओहोटी झाल्यावर शिपे काढायला खाडीत जातात. शिपे म्हणजे म्हारई. बरेच जण परंतु आमच्या गावी यांना शिपे असे बोलतात. रविवारच्या दिवशी शिपे खाजनाला खूप मिळतात असे बोलतात. शिपे काढायला बरीच माणसे रविवारी जातात. शिपे काढायला आम्ही दोन कोयत्या घेतल्या होत्या. एक पिशवी घेतली. माझ्या मामाच्या गावासमोर म्हसोबच्या पारीला हे शिपे जास्त सापडतात. आम्ही भाटीवरून सुरुवात केली. शेवटी म्हसोबाजवळ पोहोचलो तेव्हा आम्हाला भरपूर शिपे सापडले. शिपे काढताना चिखलात कोयतीने खरडवली जाते. कोयतीच्या टोकीने चिखलातील शिपे काढायला जाम मजा येते. वर्षा आणि मला शिपे काढायला खूप मजा आली. एकदा शिपे भेटायला लागले की, भरपूर सापडतात. आम्ही एकूण एकोणतीस शिपे खाडीतून काढले. शिपे घरी जाऊन त्यातील गर कसा काढतात ते सुद्धा दाखवले आहे. घरी जाऊन शिंपल्याचा कालवण म्हणजे रस्सा कसा घातला ते पण दाखवलं आहे. शिंपल्याचा रस्सा खूप चविष्ट होतो. आम्ही रात्रीच्या जेवणात शिप्याचा रस्सा खाल्ला. अतिशय चविष्ट रस्सा झाला होता. तुम्हाला या व्हिडीओमध्ये खाडीतून शिपे कसे काढतात ते दाखवले आहे. शिपे म्हणजे काय, शिपे कशाला बोलतात हे दाखवले आहे. शिप्याचा रस्सा कसा बनवतात, शिपे कसे साफ करतात हे दाखवले आहे. हा शिपे काढायचा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #KhaditilShipe #MharaiCatching #ShimplyanchaRassa #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.instagram.com/koknatlamumbaikar