MENU

Fun & Interesting

भाग ९ | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन| निवडक भजन |BHAJAN SANGRAH | SHRI MOHAN GAIGOL COLLECTION

Video Not Working? Fix It Now

आमच्या चॅनल ला आपण दान देऊ शकता 🙏🙏 GOOGLE PAY : 7038205363 You can contribute to our channel : GOOGLE PAY : 7038205363 ४१. डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे ॥ तुझीया चरणी वाहे भीमा चंद्रभागा , कसा येऊ सांग देवा झालो मी अभागा , आता तरी एक वेळा देवा मला पाव रे ॥ तुझ पाहण्यासी माझा जीव भूकेला, धीर ना वाटे देवा माझीया मनाला , येऊ मी कोण्या रिती दूर तुझे गाव रे ॥ गोर्या कुंभाराची देवा ऐकली विनवनी, भक्त एक़नाथा घरी वाहीलेसे पाणी, मजकान मिळे देवा तुझ्या पायी ठाव रे ॥ प्रल्हादा कारणे कैसा नरसिंह झाला , भक्त तारण्याशी प्रभू दृष्ट मारियला, म्हणे दास तुकड्या मजला रुप तुझे दाव रे ॥ ४२. उघडा हे दार आम्ही आलो पाया । नका पंढरिराया ! दूर लोटू || बाहेरील श्वान ओरडती जोरे । चावतील वारे ! अंगालागी ||है अंधारिया रात्री दुजा कोणी नाही । मारिता हाकही कोण ऐकी ? || तुकड्यादास म्हणे मज घ्याहो आंत । घरूनिया हात ओढा तुम्ही || ४३. आवडला मज सखा पंढरीराया । चित्त तयाविन शांत नोव्हे ॥धृ॥ तयाचीच लेणे लाविन या देहे । काढिल या संदेहा घरातुनी ॥ हाती टाळ खांदी पताकांचा भार । नामाचा उच्चार मुखवाटे ॥ तुकड्यादास म्हणे मन मोहविले । आपुलेसे केले पंढरीराये ॥ ४४. दान हेचि मागो सख्या पंढरीराया । नामाविन वाया न गमो क्षण ॥ काया वाचा मने, घडो जनसेवा । लागो जीवभाव भक्ति तुझी ॥ जागृती वा स्वप्नी, न तुटे ध्यास । तयाविन आस, न उरो मज ॥ तुकड्यादास म्हणे, गोड हा शेवट । वृत्ती राहो नीत, तुझ्या स्वरुपी ॥ ४५. कीर्तनाच्या रंगी हरी रगला । भोळ्या भाविकासी छंद लागला ! ।। युक्तिवादी, बुध्दिवादी पाहती डोकावुनी । त्यांना वाटे वेड्यांचा बाजार जाहला झणी ।। देहभान हे विसरुनी त्यांनी, स्वाभिमान सोडला ।। यमराजाच्या दरबारी जंव,स्वाभिमानी पोहोचती । अहंकार घेउनी शिरावरी, घट्ट उभे राहती ।। केल्या दुष्कर्माच्या बदली, जाती भोगावया ।। नम्र सदा देवाच्या पायी, काम - क्रोध सोडुनी । तोचि आवडे प्रभुरायाला, नाचे हरी कीर्तनी ।। सत्‌कर्माचे, सत्‌धर्माचे, त्यासी म्हणे आपुला ।। युक्ति-बुध्दी-भक्ति यांची सांगड जे घालती । वैराग्याच्या तपोबलाने प्रेमा संपादिती ।। तुकड्यादास म्हणे कनका जणु सुगंध हा लागला ।।

Comment