दोन्ही ठाकरेंचा प्रयोग टेस्ट नाही तर प्रॅक्टिकल शिंदेंना जे नको होत तेच घडतंय थेट वजीर उडवला...
ठाकरे आणि पवार ब्रँड संपत नाही हवं तर लिहून देतो राज ठाकरेंनी हे स्टेटमेंट करून वर्षा बंगल्यावरची फडणवीसांची भेट असो, कि उदय सामंत यांनी दिलेला हार गुच्छा .. कि शिंदेनी राज ठाकरेंसोबत केलेला डिनर असो .. तिन्ही गोष्टींना केराची टोपली दाखवली .. राज यांनी ही भूमिका घेतली असताना दुसऱ्याच दिवशी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन उध्दव ठाकरेही मनसेसोबत युती करायला दिलसे तयार असल्याचं सांगत उ्ध्दव ठाकरेंकडूनही ग्रीन सिंग्नल दिला आहे. केवळ युतीचं नव्हे तर मनही जुळवायची असल्याचं राऊत यांनी सांगितलं. तर आदित्य ठाकरेंनी फक्त कोणीतरी मोठ्या माणसांनी पुढे येऊन पुढाकार घ्यावा असं सांगितले .. तर अनिल परब यांनी दोन्ही भावांनी लवकरात लवकर एकत्र यावं असं म्हंटल्या तर अंबादास दानवेंनी देखील दोन्ही भावांची युती झाली तर अनेकांनाच्या मनसुब्यांवर पाणी फिरेल असं म्हणत शिंदेंना टोला लगावला
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक होण्याने फरक पडतोय .. म्हणून तर ही युती होऊ नये म्हणून अनेकांनी देव पाण्यात ठेवलेत .. बाहेर नाही पण मुंबईत दोन्ही ठाकरेंना रोखणं भाजपला आणि शिंदेंना सहजासहजी शक्य नाहीच .. चला समजून घेऊया राज ठाकरेंनी एका दगडात किती पक्षी उडवले ..
#uddhavthackeray #eknathshinde #rajthackeray #devendrafadnavis #mahayuti #shivsena #politics