पहा तुम्हासाठी हो दावीदाच्या नगरात!!
जन्मला आज प्रभू ख्रिस्त!!ध्रु!!
गुंडाळूनी बाळंत्यानं !!
ठेविलेले बालक छान !!
आढळेल गव्हाणीत,
खुण ठेवा ध्यानात !!१!!
होणार आनंद जो लोका !!
ती सुवार्ता सांगतो ऐका !!
रहा स्थिर आता हो,
होवु नका भयभीत !!२!!
तारणारा सर्व जगाचा !!
कैवारी पतीत जनांचा !!
स्वर्गसुख सोडूनी,
आला झणी अवनीत !!३!!
गीत व संगीत (ब्र.विश्वास लोंढे)