गाण्याचे बोल -
खेळ खेळतो कुंजवनातऽऽऽऽ गोकुळचा मी राणा,
राधा पुरती रमुनी गेली रंगपंचमीच्या सणा,
जडलीऽऽऽऽ तुझ्यावरी प्रिती,
जडलीऽऽऽऽ तुझ्यावरी प्रिती || धृ।।
बाळ गोपाळां संगे रंगला, खेळ हा वृंदावनी,
होळी खेळण्या सुरुवात झाली,
गुलाल हा ऊधळूनी,
सप्त रंगात न्हाऊन गेलीऽऽऽऽ
नटली ही गोकुळ नगरी,
पिचकारीने रंग उडवितो, छळतो गोपिका सही
जडलीऽऽऽऽ तुझ्यावरी प्रिती, जडलीऽऽऽऽ तुझ्यावरी प्रिती !! 2!!
तु माझी राधा, मी तुझा कान्हा,
प्रित जडली ही मना, युगायुगांचे, नाते हे अपुले, स्पर्शनी सांगे तना,
सातव्या अवतारी दिले वचनssss
पूर्ण तू राधे करना,
प्रेमाची ही अमरगाथा, पटवुनी देऊ जना,
जडलीऽऽऽऽ तुझ्यावरी प्रिती, जडलीssss तुझ्यावरी प्रिती ||