रोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित चिंतन पुष्प...आनंदमय अशा भगवंताचे नाम घेऊन अंतरंगात आनंद कसा उत्पन्न होतो, विषयावर किंवा कारणांवर अवलंबून असलेला आनंद चिरंतन टिकत नाही, खरा आनंद भगवंताच्या स्मरणात येतो व असा चिरंतन टिकणारा आनंद पुढे समाधानात परावर्तित होतो इत्यादी बाबींचा परामर्श या चिंतनात घेतलेला आहे