🟠 सप्तरंगी संगीत जीवन प्रस्तुत 🟠
निर्मित: सुनिल घेवडे,मंगेश कुळये
🔹तूच कान्हा हृदयात..!🔹
राधा-कृष्ण प्रेम गीत सन २०२४
लेखक/गीतरचना/गायक : सुनिल घेवडे
पार्श्वगायिका :- कु. सानिका कुरटे
कोरस :- सिद्धी धूमक, सिद्धी गोरिवले, शुभम घेवडे, श्रेयश घेवडे,
संकल्पना: सचिन कुरटे
विशेष सहकार्य-मार्गदर्शक : कृष्णा येद्रे, संदीप पालेकर सर, प्रसाद दळवी, गिरीश रामगड, सुरेश पगडे, ऋषभ घेवडे
संगीत/संयोजन-रेकॉर्डिंग: संदीप पालेकर सर, स्वराधिश स्टुडिओ ( डोबिवली)
बाळ कलाकार : तेजस कदम,श्रावणी पाचकले
व्हिडिओ संपादक-एडिटर : शुभम घेवडे, सलोनी घेवडे
.....राधा-कृष्ण प्रेम गीत.....
राधा )तूच कान्हा हदयात, तूच श्वासात
राधा तुझ्या ध्यासात, श्याम मुखात
तुझ्या मुरलीचे स्वर, लावती मला ओढ
लागे या जीवाला, तुझ्या प्रेमाचे वेड
हरवुनी स्वतःला, सूर देशी मुरलीला
मुरलीची साद तू, घालशी राधेला !!धृ!!
कोरस)हरे कृष्ण गोविंदा,श्याम मुकुंदा,तुझी ती प्रीत सदा,गवळण राधा
कान्हा )तूच राधा हदयात, तूच नैनात
साथ तुझी जीवनात, युगा युगात
तुझे सुंदर रूप, लावीते मला वेड
लागे या जीवाला, तुझ्या प्रेमाची ओढ
विसरूनी स्वतःला, शोधीतो मी राधे तुला
बोलवी कान्हा तुला, वाजवुनी मुरलीला!!धृ!!
कोरस)हरे कृष्ण गोविंदा,श्याम मुकुंदा,तुझी ती प्रीत सदा,गवळण राधा
राधा)तुझं अनं माझं,प्रेमनिराळ,एकरूप होऊनी दोघं
तुझा सहवास,जणू मोह कसा,जाई रंगुनी तुझ्या संघ
तुझ्या मुरलीचा नाद, घालीतो मला साद
लागे ही चाहूल वृंदावनाला
हरवुनी स्वतःला, सूर देशी मुरलीला
मुरलीची साद तू, घालशी राधेला !!१!!
कोरस)हरे कृष्ण गोविंदा,श्याम मुकुंदा,तुझी ती प्रीत सदा,गवळण राधा
कान्हा ) होई वेडा पीसा, तू न दिसता, क्षणा क्षणाला आठवणीत
गुंतला श्वास, तुझ्या श्वासात, मन तरंग तुझ्या प्रेमात
कस समजावू स्वतःला, या वेड्या मनाला
जीव भुलला तुझ्या या देखण्या रुपाला
विसरूनी स्वतःला, शोधीतो मी राधे तुला
बोलवी कान्हा तुला, वाजवुनी मुरलीला!!२!!
कोरस)हरे कृष्ण गोविंदा,श्याम मुकुंदा,तुझी ती प्रीत सदा,गवळण राधा
#Saptrangi_jeevan
#Saptrangi_sangeet_jeevan
#सप्तरंगी_संगीत_जीवन
#सप्तरंगी_जीवन
#कोंकणी_स्वर
#Kokani_Swar
#kokankar
#सप्तरंगी
#saptrangi_kokan_kalamanch_mumbai
#skkmcreation
#me_kokani_suraj
#Kokani_teja