या व्हिडिओ मध्ये तुम्हाला नवीन काहीतरी नक्कीच पाहायला मिळेल.
कळसूत्री बाहुल्या हा कलाप्रकार पूर्वीच्या काळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सादर केला जात होता.त्याला लोकाश्रय होता. परंतु आताच्या आधुनिक युगामध्ये मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध असताना हा कलाप्रकार काही प्रमाणात मागे पडला होता नष्ट होण्याच्या मार्गांवर होता पण त्याला जिवंत ठेवण्याच काम आपल्या सिंधुदुर्ग जिल्हातील पिंगुळी गावातील ठाकरवाडीतील या कलाकारांनी केल. पिंगुळी गावातील कलागुरु श्री गणपत सखाराम मसगे यांना या कलेतील योगदानाबद्दल राष्ट्र्पती पुरस्कार हि भेटला आहे.आणि हि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
मंडळींनू पिंगुळी गावातील ठाकरवाडीमध्ये पिंगुळी महोत्सव महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या सहकार्यातून आयोजित करण्यात आला होता या वेळी त्यामध्ये अनेक प्राचीन पण आता नामशेष होण्याच्या मार्गांवर असणारे लोककला प्रकार सादर करण्यात आले.या महोत्सवा मध्ये कळसूत्री बाहुल्या /पांगुळ बैल /राधा नूत्य यांसारखे लोककला प्रकार सादर केले गेले. या सर्व प्रकारांचा मी या व्हिडिओ मध्ये फक्त काही भाग घेतलेला आहे. कळसूत्री बाहुल्या, पांगुळ बैल, राधा नूत्य आणि पारंपरिक फुगडी या सर्वांचा पूर्ण व्हिडिओ मी वेगवेगळा लवकरच अपलोड करेन.
मंडळींनी कुडाळ शहराजवळ पिंगुळी या गावात काही प्रमाणात ठाकर समाजाची लोकवस्ती असून त्यांनी अजूनही आपली ओळख जपली आहे. हा समाज मुख्यता चित्रकथी,कळसूत्री बाहुल्या, पांगुळ बैल, राधा नूत्य या कला सादर करतो. वरील सर्व कला सध्याच्या काळामध्ये दुर्मिळ होत असून नामशेष होण्याच्या मार्गांवर आहेत. या कलांच जतन व्हावं, संवर्धन व्हावं आणि या कलांना परत एकदा मानाचं समाजात स्थान मिळावं म्हणून हि मंडळी खुप मोठं कार्य करत आहेत.
या साठी त्यांना अनेक पुरस्कार हि मिळालेले असून त्यात रष्ट्र्पती पुरस्काराचा हि समावेश आहे.
मित्रओ पिंगुळी या ठिकाणी आदिवासी समाजजीवन व कोकणी समाज जीवन यांची ओळख करून देणार एक म्युझियम असून त्या म्युझियम मध्ये अनेक दुर्मिळ वस्तू, पोथी आहेत.
या म्युझियम च्या भिंतीनवर रामायनातील अनेक देखावे साकारलेले असून आत मध्ये कोकणी जीवनातील अनेक वस्तू आहेत या म्युझियम ची फीस फक्त 100 रुपये आहे आणि या 100 रुपयामध्ये तुम्हाला गाईड पण मिळतो.तुम्ही कधी पिंगुळी या साईड ला गेलात तर नक्की या म्युझियम ला भेट द्या हि विनंती.
तुम्हाला खात्री देतो की 100 रुपयामध्ये 1000 रुपयाचा आनंद नक्कीच तुम्हाला मिळेल.
अधिक माहिती साठी
कृष्णा मसगे- 98929 26590
#kokan
#kokanbhoomi
#pokharan
#pinguli
#pingulimahotsav
#thakarlokkala
#kalsutribahuli
#पिंगुळीमहोत्सव
#आदिवासी
#aadivasi