जवळपास दोन अडीच किमीची पायपीट करून भवानी कड्याकडे पोहोचता. शेवटचा २०० मीटर अंतराचा तीव्र उतार पार करता आणि समोर साक्षात आईभवानी तुम्हाला दर्शन देते. या ठिकाणी मिळणारी शांतता विलक्षण अनुभूती देणारी आहे. तिथे जाण्यापूर्वी दोन टेकड्या दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगडाचे ते कटू अनुभव अंगावर झेलत उभ्या आहेत.