•।। युगे अठ्ठावीस उभा पांडुरंगा ।।
युगे अठ्ठावीस उभा पांडुरंगा तू विठेवरी देवा बसना जरा तरी ।।
लाडक्या भक्ताला भेटण्यासाठी, पुंडलिकाच्या घरी तू गेला विठ्ठल रखुमाई, विठोबा रखुमाई । माय पित्याची सेवा करताना, विठेवरी त्याने उभा तुला केला विठ्ठल रखुमाई, विठोबा रखुमाई वर्षे किती झाली पाय दुखतील तुझे हरी ।। 1।।
भक्तांच्या रक्षणा, जगाच्या कल्याणा देहाला किती यातना देशील विठ्ठल रखुमाई, विठोबा रखुमाई अजून किती काळ उभा राहुनी, भगवंतां तू किती कष्ट हे घेशील तुझ्यामुळे उभी रुक्मिणी माता थकली असेल खरी ।। 2 ।।
जानोबा तुकाराम नाम जनीचा हट्ट पुरविला पंढरीनाथा विठ्ठल रखुमाई, विठोबा रखुमाई तैसा एक हट्ट पुरव तू आमुचा विनवितो चरणी ठेवूनि माथा विठ्ठल रखुमाई, विठोबा रखुमाई विठेवरूनी ये खाली हात जोडीतो वारकरी ।। 3।।
#konkan #bhajanmandal #trending #varkaribhajan #vithalmauli