थिंकबँक आणि स्टोरीटेल प्रस्तुत 'थिंकबुक्स दिवाळी विशेष' या मालिकेतील दुसरी मुलाखत...
प्रकाशनापूर्वीच अठरा हजारांपेक्षा अधिक पुस्तक नोंदणीचा विक्रम प्रफुल्ल वानखेडे यांच्या 'गोष्ट पैशापाण्याची' या पुस्तकाने नोंदवला आहे .३०,००० पुस्तकांची पहिली आवृत्ती संपून तेवढ्याच प्रतींची दुसरी आवृत्तीदेखील आली आहे.
साक्षरता आणि आर्थिक साक्षरता या दोन गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. पैसै कमावण्यापेक्षा ते कुठे खर्च करावे हे आपल्याला माहिती नसतं. आर्थिक साक्षरतेच्या बाबतीत आपण अजूनही खूप अनभिज्ञ आहोत. आर्थिक साक्षरता म्हणजे काय? आर्थिक साक्षर कसं व्हायचं? पैशाची गुंतवणुक कशी करायची? कुठे करायची?
या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारी, प्रफुल्ल वानखेडे यांची मुलाखत...