वसईची प्रसिद्ध सुकेळी - एक माहितीपट | वसई | A documentary on Vasai's Sukeli | Vasai
निसर्गाने सौंदर्याची मुक्त उधळण केलेल्या महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील अनेक तालुक्यांपैकी एक म्हणजे वसई. हिरव्या पाचूसमान भासणाऱ्या या प्रदेशात निसर्गाची किमया पावलोपावली पाहायला मिळते. वसई मुंबईला कित्येक वर्षांपासून फुले, दूध, भाजी पुरवत आलेली आहे पण या सर्वात प्रकर्षाने लक्षात राहतात ती वसईची केळी. वसईकरांच्या मुंबईत मोक्याच्या ठिकाणी केळीच्या वखारी होत्या यावर आताची पिढी कदाचित विश्वास ठेवणार नाही.
वसईच्या केळींसोबतच, सुकेळी म्हणजे विशिष्ठ पद्धतीने सुकविलेली केळी देखील खूपच प्रसिद्ध आहेत. पूर्वी वसईच्याच राजेळी जातीच्या केळीपासून सुकेळी बनवली जात मात्र आता दक्षिणेतून केळी आणून त्यापासून सुकेळी बनवली जातात.
आजच्या भागात आपण सुकेळीचे माहेरघर असलेल्या कोफराड - परसाव गावातील १०० पेक्षा जास्त वर्षांपासून या उद्योगात असलेल्या कुटुंबातील श्री. पायस रॉड्रिग्ज यांच्याकडून सुकेळीचा इतिहास, सद्यस्थिती, बाजारपेठ, अडचणी या सर्व बाबी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत.
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
विशेष आभार:
श्री. पायस रॉड्रिग्ज, परसाव - कोफराड, विरार पश्चिम
९२२४७३५६१०
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद!
फेसबुक
https://m.facebook.com/SunilDmellovideos
इन्स्टाग्राम
https://instagram.com/sunil_d_mello
व्हॉट्सॲप चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p
वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES
#sukeli #vasaisukeli #vasai #drybanana #vasaifarming #vasaitradition #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos #sunildmelloshorts