https://youtube.com/@warkarisantsahitya?si=uPMxSpSkPfEgQHhP
#warkarisantsahitya
९७३. कृपेचीं उत्तरें देवाचा प्रसाद । आनंदें आनंद
वाढवावा ॥ १ ॥ बहुतांच्या भाग्यें लागलें जहाज। येथें आतां
काज लवलाहो ॥ २ ॥ अलभ्य ते आलें दारावरी फुका। येथें
आतां चुका न पाहिजे ॥ ३॥ तुका म्हणे जिव्हाश्रवणाच्या द्वारें।
माप भरा बरें सिगेवरी ॥ ४ ॥