साईसंस्थानच्या माजी विश्वस्तांना धमकीचे फोन | आ.आशुतोष काळेंनी धमकी दिल्याचा गंभीर आरोप | Sai Trust
Threatening phone calls to former trustees of Sai Sansthan
MLA Ashutosh Kale made a serious allegation of threats
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तिन्ही पक्षाचे पदाधिकारी घेत साई संस्थानचे 17 सदस्याचे विश्वस्त मंडळ नेमण्यात आले होते.. या विश्वस्त मंडळाच्या विरोधात तीन याचिका दाखल झाल्या होत्या.. यात सप्टेंबर 2022 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने विश्वस्त मंडळ बरखास्तीचा निर्णय दिला.. यानंतर तत्कालीन अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या सह 16 सदस्यांनी सर्वोच्च न्यायलयात आव्हान दिले.
सध्या यावर सुनावणी सुरु असून अलिकडेच राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत सहभागी झालाय.. आमदार आशुतोष काळे हे अजित पवारांचे निकटवर्तीय असून त्यांनी व अनुराधा आदीक व राहुल कनाल या सदस्यांनी दाखल अपिलातून माघार घेतलीये.. मात्र इतर सदस्य माघार घेत नसल्याने त्यांना सरकारच्या वतीने आमदार काळे यांनी फोन केल्याच समोर आलय..सात विश्वस्तांना अपील मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा विश्वास्थांनी पत्रकार परीषदेत आरोप केला.
सुप्रिम कोर्टातील अपिल मागे घ्या अन्यथा सरकार तुमच्या मागे ईडी लावेल, रस्त्यान फिरण कठीण होईल, राजकिय कारकिर्द संपवली जाईल असा फोन करुन आमदार आशुतोष काळें कडून धमकवल्याचा गंभीर आरोप माजी विश्वस्त आणि याचिकाकर्ते अँडव्होकेट सुहास आहेर,सचिन गुजर आणि अविनाश दंडवते यांनी केला.
follow me other platforms :
Please visit our website- https://sp24taas.com/
For More latest news and Video go to- https://www.youtube.com/sp24taas
Like us on Facebook page - https://www.facebook.com/sp24taas/
https://twitter.com/Sp24N
https://www.instagram.com/sp24taas/
--------------------------------------
#sp24taas #marathibatmya #latestnews